तीन ध्येयवेड्या तरुणांनी ओसाड शेताचे केले नंदनवन

Turmeric cultivation yields higher at lower cost
Turmeric cultivation yields higher at lower cost

खेड (रत्नागिरी) : कोकणातील पारंपरिक शेतीला छेद देत तीन ध्येयवेड्या तरुणांनी तालुक्यातील चाटव गावांमध्ये हळदीची शेती केली. एक वेगळा पर्याय शोधला आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी हळदीची शेती कोकणातील शेतकर्‍यांसाठी निश्‍चितच फायद्याची ठरेल असा विश्वास जितेंद्र, राम आणि विश्वास या तीघांनी  व्यक्त केला. 


कोकणातील पारंपरिक पिके पुर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षात कोकणातील पारंपारिक शेतीला अतिशय वाईट दिवस आलेले आहेत. कधी अतिवृष्टी तर अवर्षण यामुळे कंटाळलेला शेतकर्‍यांनी आता शेती करणेच सोडून दिले आहे. मात्र येथील एका बँकेत कॅशिअर असलेले जितेंद्र शिंदे, लॉकडाऊनमुळे मुंबईतून गावात परत आलेले राम कदम आणि पारंपारिक शेतीला कंटाळले विश्वास कदम या तीन तरुणांनी ओसाड शेतात हळदीचे पिक घ्यायचे ठरवले.शिंदे यांनी इंटरनेटद्वारे पिकाची पुर्ण माहिती घेऊन हळदीचे बियाने पुरविणार्‍या उमेद ’ या संस्थेशी संपर्क साधला. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चाटव येथे ओसाड असलेल्या सुमारे 20 गुंठे क्षेत्रामध्ये हळदीची लागवड केली. हळदीची लागवड , लागवडीनंतर मशागत याबाबतची सर्व माहिती इंटरनेटवरूनच मिळवली. सुरवातीला ही शेती म्हणजे चेष्टेचा विषय ठरला.

पारंपारिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे अभिप्राय येऊ लागले. त्यामुळे कोकणात हळदीच्या शेतीचा प्रयोग करून आपण काही चुकीचे तर केले नाही ना, असे या तरुणांना वाटू लागले मात्र त्यांनी चेष्टा करणार्‍यांकडे दुर्लक्ष करून शेतीची मशागत करण्याचे काम सुरुच ठेवले.ही शेती आता चांगलीच बहरली आहे. मार्च एप्रिल दरम्यान हे पिक काढणीला येणार असून त्यानंतरच हळदीची शेती किती फायदेशीर आहे हे नेमकेपणाने स्पष्ट होणार आहे.या शेतीतून मिळणार्‍या पिकाबाबत या तीन्ही तरुणांना फार मोठ्या अपेक्षा आहेत. 

500 किलोचे पिक येणे अपेक्षित
शिंदे यांच्या म्हणण्यानुसार 50 किलोच्या लागवडीमधून 500 किलोचे पिक येणे अपेक्षित आहे. 20 गुंठे क्षेत्रात करण्यात आलेल्या शेतीसाठी लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च हा काही हजारामध्ये आहे. मात्र अपेक्षीत पिक आले तर येणारे पिक लाखांमध्ये असेल. यावर्षी अपेक्षित पिक आले तर पुढच्या वर्षी काही जागा भाडेतत्वावर घेऊन मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करण्याचा विचार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com