वाकण पाली-खोपोली मार्गवरील अवजड वाहतूक बंद

वाकण पाली-खोपोली मार्गवरील अवजड वाहतूक बंद

पाली - वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. या मार्गाची सद्यस्थितीत या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तसेच या मार्गावरील महत्वाचे तीन नदी पूल देखील कमकुवत झाले आहे.

पावसाळ्यात येथून वाहतूक करणे जिकरीचे होते. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी या मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक महिनाभरासाठी बंद केली आहे.  आता ही अवजड वाहनांची वाहतूक वाकण पेण खोपोली अशी वळविली आहे.  त्यामुळे वाकण पाली खोपोली रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना व प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

वाकण पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गावर  प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर पाली, व-हाड आणि जांभूळपाडा येथे तीन महत्त्वाचे नदी पूल असून यातील व-हाड येथील पुलाची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे. तसेच जांभुळपाड आणि पाली पूल देखील कमकुवत झाले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक भराची अवजड वाहने जाणे, जुने बांधकाम असल्याने व सद्यस्थितीत जुना व जर्जर झाल्याने व-हाड पूल केव्हाही कोसळण्याची भीती वर्तवली जात आहे.

पाली-खोपोली मार्गावर असलेला व-हाड येथील पूल अनेक गावांसह मुंबई, पुणे व मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा दुवा मानला जातो. या सर्व गंभीर बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी  डॉक्टर विजय सुर्यवंशी यांनी वाकण पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून होणारी अवजड वाहतुक पेण वडखळ मार्गे वळविल्याने प्रवाशी वर्गातून व वाहनचालक यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सदर रस्त्याचे वेगाने होणारे नुकसान थांबेल व अपघातांनाही आळा बसेल. जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश केवळ कागदावर न रहाता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला हवी अशी जनतेची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com