रायगड - औद्योगिक क्षेत्रातील बंद पथदिवे सुरू

लक्ष्मण डूबे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बंद पडलेले विजेचे दिवे एमआयडीसीने पुन्हा सुरू केले असल्याने पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोशिएशनच्या पदाधिका-यांनी समाधान व्यक्त केले. पथदिवे बंदची सकाळने बातमी याआधी प्रसिद्ध केली होती. 

रसायनी (रायगड) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बंद पडलेले विजेचे दिवे एमआयडीसीने पुन्हा सुरू केले असल्याने पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पथदिवे बंदची सकाळने बातमी याआधी प्रसिद्ध केली होती. 

औद्योगिक क्षेत्रातील सिध्देश्वरी कॉर्नर ते अल्काईल आमाईन्स लिमिटेड कंपनी पर्यंतच्या दुभाजकावरील तसेच कैरे एस टी बस थांबा ते कैरे गावा पर्यंतचे रस्त्याच्याकडचे पथदिवे बंद पडले होते. रात्री जाताना नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे एमआयडीसीच्या विरोधात नाराजी व्यक्त होत होती. 

दुरुस्तीचे काम करून दिवे त्वरित सुरू करावे या मागणीची सकाळने 8 एप्रिल रोजी अंकात बातमी प्रसिद्ध केली होती. दरम्यान एमआयडीसीने या मागणीची दखल घेतली. पथदिवे दुरुस्तीचे काम करण्यात आले. पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील पथदिवे सुरू करण्यात आले असल्याची माहिती एमआयडीसीचे साहाय्यक अभियंता अशोक कावळे यांनी दिली आहे.

Web Title: Turn on streetlights in industrial area

टॅग्स