संशयास्पद फिरणाऱ्या दोघांना न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

रत्नागिरी - शहरात पहाटे संशयितरीत्या फिरताना आढलेल्या दोन संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. मतीन महमूद शेख (वय 24, रा. एमजीरोड, खान कॉम्प्लेक्‍स-बाजारपेठ) व इरशाद महमदहुसेन शहा (वय 19, रा. कीर्तिनगर, मजगावरोड) अशी संशयितांची नावे आहेत.

ही घटना 9 नोव्हेंबरला पहाटे साडेपाचच्या सुमारास जे. के. फाइल्स येथील मधुरा पान शॉपजवळ घडली होती. संशयित दुचाकीवरून फिरत असताना शहर पोलिस ठाण्यातील पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाने अटक केली होती. त्यांनी चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच त्यांच्याकडे एक लोखंडी रॉड, मोबाइल, बॅटरी व दुचाकी असा माल सापडला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयात त्यांना हजर केले असता दोन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: Two arrested for suspicious activity