esakal | चार हातांनी दिली दोन पायांना उभारी..! कुठे घडली घटना ? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

two businessman help a person who leave his leg in accident but they both help in operation of leg in konkan

स्वतः च्या पायावर उभ्या राहणाऱ्या तरुणाला कुबड्यांचा आधार घ्यावा लागला.

चार हातांनी दिली दोन पायांना उभारी..! कुठे घडली घटना ? वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रस्ते अपघातात संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे येथील तरुणाने एक पाय गमावला. घरची जबाबदारी खांद्यावर असताना पाय गमवावा लागल्याने कुटुंबाचा कणाच मोडला. मात्र या तरुणाच्या मदतीला धावून आले दोन उद्योजक महेंद्र गुंदेचा आणि सौरभ मलुष्टे. या तरुणाला कृत्रिम पाय बसवून देण्याची जबाबदारी या दोघांनी पार देखील पाडली.

हेही वाचा - आप्तेष्टांना बाप्पाचे दर्शन होण्यासाठी असाही फंडा... 

संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे येथील एकनाथ रेवाळे हा तरुण. गावातील एक हरहुन्नरी असणाऱ्या ह्या तरुणावर नियती रुसली. रस्ते अपघातात या तरुणाला एक पाय गमवावा लागला. स्वतः च्या पायावर उभ्या राहणाऱ्या तरुणाला कुबड्यांचा आधार घ्यावा लागला. अशा परिस्थितीत चालणे देखील फार कठीण होते. मात्र या तरुणाच्या मदतीसाठी सौरभ मलूष्टे आणि महेंद्र गुंदेचा धावले.

घरातील कुटुंब प्रमुख तरुणावर कोसळलेल्या या संकटातून त्याची सुटका करण्याचा निर्णय गुंदेचा आणि मलुष्टे यांनी घेतला. उपचारासाठी रेवाळे यांना तात्काळ हुबळी कर्नाटक येथील ऑल इंडिया जैन युथ फेडरेशन संचालित महावीर लिंब सेंटर येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यानुसार रेवाळे यांना हुबळी येथील लिंब सेंटर मध्ये पाठवून त्यांना कृत्रिम पाय मोफत उपलब्ध करून देण्यात आला. हुबळी येथे जाताना एका पायावर आणि हातात कुबड्या घेऊन गेलेले अपघातग्रस्त एकनाथ रेवाळे येताना कृत्रिम पायाच्या सहाय्याने कुबड्या शिवाय चालू लागले. 

हेही वाचा - काजू पीक देखील आता बेभरवाशाचे, काय आहेत कारणे? 

हुबळीतील अशोक कोठारी आणि रत्नागिरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन ढेरे यांनी देखील या कामात मोलाचे सहकार्य केले. रत्नागिरी जिल्ह्यातील कुठल्याही अपंग व्यक्तीला कृत्रिम अवयव बद्दल मदत हवी असल्यास त्यांनी महेंद्र गुंदेचा व सौरभ मलुष्टे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. आर्थिक दुर्बल व्यक्तींना  शक्य तितके मोफत कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

loading image