कळव्यातील खाडीत दोन मुले बुडाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

कळवा - खाडीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला, तर एका मुलाला वाचविण्यात नागरिकांना यश आले. बिजेंद्र सहानी (वय 8) व कुलदीप मंगल लोंडिया (वय 9) अशी मृत मुलांची नावे आहेत. महात्मा फुलेनगरमधील 8 ते 10 वयोगटांतील चार मुले आज दुपारी घरी न सांगताच सायबानगरजवळील खाडीत पोहण्यासाठी उतरली होती. त्यांना खाडीत जात असताना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे बिजेंद्र व कुलदीप बुडाले. पाण्यात असलेला जितू हा घाबरला, तर आणखी एक मुलगा अली हा काठावरच उभा होता. या दोघांनी आरडाओरड केल्यानंतर काही तरुणांनी धाव घेतली आणि जितू याला पाण्याबाहेर काढण्यात आले.
Web Title: two child drawn in kalawa khadi