सायकल खेळताना विजेचा झटका लागून दोन मुलांचा मृत्यू

अमित गवळे
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

पाली : सुधागड तालुक्यातील करचुंडे आदिवासीवाडीतील दोन आदिवासी मुलांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.25) सायंकाळी पावणेचार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे विजवितरण विभागाच्या गलथान कारभार समोर आला आहे. ही दोन्ही मुले सायकवरुन फिरत असताना जमीनीवर पडलेल्या जिवंत विद्यूत वाहिनीचा शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे करचुंडे आदिवासीवाडीसह संपुर्ण सुधागड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
याबाबत सविस्तर हकिकित अशी की, करचुंडे आदिवासीवाडीत राहणारे आर्यन रुपेश जाधव (वय 10) , रवी सिताराम वाघमारे (वय 11)  हे दोघेजण सायकलवरुन गावाच्या खाली फेरफटका मारत होते. यावेळी एका विज खांबावरुन जमीनीवर पडलेल्या जिवंत विद्यूत वाहिन्यांच्या संपर्कात ही मुले आली. परिणामी विजेचा जबरदस्त धक्का लागून या मुलांचा करुन अंत झाला. यापुर्वी देखील सुधागड तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत विजेचा शॉक लागून चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एस. खेडेकर व राम कांदे घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा होऊन पुढिल तपास सूरु आहे.

Web Title: Two children died due to electricity Shock While Playing Cycle