मुख्यमंत्र्यांकडून कणकवलीला सव्वा दोन कोटींचा निधी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

कणकवली - शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून शहरातील जास्तीत जास्त विकासकामे पूर्ण करणार आहोत, अशी माहिती नगराध्यक्षा माधुरी गायकवाड आणि उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी आज दिली. 

येथील नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद झाली. या वेळी विरोधी पक्षनेत्या राजश्री धुमाळे, नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, भाजपचे शहर प्रभारी भाई परब आदी उपस्थित होते. 

शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे शहरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सव्वादोन कोटींचा निधी नगरपंचायतीला वर्ग केला आहे. या निधीमधून रस्त्यांची कामे, नाल्यांचे बंदिस्तीकरण, गटारे, ठिकठिकाणी पथदीप यांसह सर्वच प्रभागात विकासाचीकामे केली जाणार असल्याचे सौ. गायकवाड आणि पारकर म्हणाले. 

शहरातील पर्यटन सुविधा केंद्राचे अद्यावयतीकरण लवकरच केले जाणार आहे. याखेरीज नळपाणी योजनेची दुरुस्तीच्या काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. शहरातील मुडेश्‍वर मैदान स्थानिक ग्रामस्थांनी कुंपण घालून बंद केले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पुढील पंधरा दिवसांत तेथील ग्रामस्थांची बैठक बोलाविण्यात आली आहे. दरम्यान, मुडेश्‍वर मैदानाची जागा संपादित करण्यासाठी राज्य शासनाकडे जादा निधीचीही मागणी केली असल्याचे पारकर म्हणाले. 

निधी मागे गेलेला नाही... 
दलित वस्ती विकास योजनेचा 80 लाखांचा निधी मागे गेला, असा खोटा प्रचार विरोधकांनी सुरू केला आहे. उलट या योजनेतून मागील आर्थिक वर्षात 15 लाख रुपयांचा निधी आला. तसेच 32 लाख रुपयांचा निधी येथे शिल्लक आहे. याखेरीज पुढील वर्षी दलित वस्ती सुधार कार्यक्रमांतर्गत 65 लाख रुपयांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे पारकर म्हणाले. 

नगरपंचायतीत येऊन खात्री करावी... 
कणकवली शहरात 1997 पासून प्राधिकरण अस्तित्वात आले. त्यावेळेपासून सर्व बांधकामांना कायदेशीर बाबी पडताळूनच परवानगी दिली जातेय. तरीही फ्लॅट, दुकानगाळे, रो हाउस आदींची खरेदी करताना त्या नियमानुसार आहेत का? याची नगरपंचायतीमध्ये येऊन नागरिकांनी आधी खात्री करावी. त्याबाबतची माहिती नगरपंचायत अधिकाऱ्यांकडून घ्यावी. त्याबाबत माहिती न मिळाल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील नगराध्यक्षा माधुरी गायकवाड आणि उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी केले. 

Web Title: Two crore to fund kankavli from CM