कुडाळातील दोघे अपघातात ठार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

कुडाळ - मुंबई-पुणे महामार्गावर पिंपलोळी (पुणे) येथे झालेल्या भिषण अपघातात पानबाजार येथील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. इस्माईल उमर शेख (वय 65) आणि जावेद इस्माईल शेख (वय 40) अशी मृतांची नावे आहेत. जावेद यांच्या पत्नी व मुलगी यात जखमी झाली. ही घटना काल (ता.3) पहाटे घडली.

कुडाळ - मुंबई-पुणे महामार्गावर पिंपलोळी (पुणे) येथे झालेल्या भिषण अपघातात पानबाजार येथील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. इस्माईल उमर शेख (वय 65) आणि जावेद इस्माईल शेख (वय 40) अशी मृतांची नावे आहेत. जावेद यांच्या पत्नी व मुलगी यात जखमी झाली. ही घटना काल (ता.3) पहाटे घडली.

कणकवली तालुक्‍यातील वरवडे येथील एका नातलगाच्या अंत्यविधीसाठी ते कुटुंबियांसह ते आले होते. अंत्यविधी आटोपून पुणेमार्गे मुंबईला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यामुळे कुडाळ शहरावर शोककळा पसरली आहे. 

इस्माईल शेख यांचे कुडाळ-पानबाजार येथे स्टेट बॅंकेच्या समोर घर आहे. तसेच त्यांचे सायकल दुरूस्तीचे दुकान होते. नुकतेच ते एका मुलाबरोबर दुबई येथे फिरून आले व मुंबई येथे मुलाकडे थांबले होते. 

वरवडे खालची मुस्लीमवाडी येथील हलीमाबी निशाणदार या वयोवृध्द महिलेचे शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास निधन झाले. याबाबत त्यांची नात अक्‍तरी शेख व कुटुंबियांना कळविण्यात आले. ते नातीसह तिचे कुटुंबिय भाड्याच्या गाडीने वरवडे येथे येण्यास निघाले. रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास ते वरवडे येथे पोचले. अंत्यविधी आटोपून ते पुन्हा मुंबई येथे जाण्यास निघाले. 

इस्माईल शेख हे मुलगा जावेद, सुन व नातवंडासह रविवारी रात्री उशिरा पुन्हा पुणेमार्गे मुंबईस जाण्यास निघाले. शेख कुटुंबिय मोटारीने (एम. एच. 04 जी. डी. 9791) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने पुणे-मुंबई लेनवरून चालले असता मार्गाच्या बाजूला थांबलेल्या डंपरवर ही मोटार आदळली. कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्‌दीत पिंपलोळी गावच्या हद्‌दीत अपघात झाला. अपघात इस्माईल व जावेत हे पितापुत्र जागीच ठार झाले. अन्य जखमी झाले. 

मुले चांगल्या नोकरीला लागल्याने इस्माईल यांनी सायकल दुरूस्तीचा व्यवसाय थांबविला होता. सध्या ते आपल्या मुलाकडे जाऊन-येऊन असायचे. जावेद हे मुंबईत चांगल्या नोकरीला होते. मध्यंतरी कंपनीमार्फत ते अमेरिका, दुबई व अन्य परदेश दौऱ्यावरही जाऊन आले होते. आता पश्‍चात चार भाऊ व अन्य मोठा परिवार आहे. 

Web Title: two dead in an accident