वाघोबा तळ्यात बुडून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नांदगाव - ग्रामपंचायत हद्दीतील वाघोबा तळ्यात बुडून गुरुवारी दोन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. संजना दिलीप वाघमारे (वय 7) आणि वैशाली शैलेश पवार (वय 9) अशी त्यांची नावे आहेत. शाळा सुटल्यानंतर त्या आपल्या दोन मैत्रिणींसोबत कचरा काढण्यासाठी तळ्यात उतरल्या होत्या.

नांदगाव आदिवासी वाडीत राहणाऱ्या संजना आणि वैशाली या जयश्री जयवंत वाघमारे (वय 4) व दीपाली पिंकेश वाघमारे (वय 9) यांच्यासह नांदगाव मराठी शाळा क्र.2 व आदिवासी बालवाडीत शिकतात. त्या दुपारी शाळा सुटल्यानंतर आदिवासीवाडीजवळच्या वाघोबा तळ्यातील कंद (कचरा) काढण्यासाठी तलावात उतरल्या होत्या. तेव्हा तलावात असलेल्या खोल खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने संजना व वैशाली या दोघी बुडाल्या; तर दीपाली आणि जयश्री यांना स्थानिकांनी वाचवले. यानंतर या मुलींना आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉ. मंगेश पाटील यांनी दोघींना मृत घोषित केले.

बचावलेल्या दोघींना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. 

Web Title: two girl student drawn in waghoba lake