आठ तासांच्या मिरवणुकीने रत्नागिरीच्या दोन राजांचे विसर्जन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

रत्नागिरी : मारुती मंदिर सर्कल येथील श्री रत्नागिरीचा राजा व आठवडा बाजारातील रत्नागिरीचा राजा या दोन सार्वजनिक गणपतींसह पोलिसांच्या मुख्यालयातील राजाचे विसर्जन आज मांडवीत करण्यात आले. दुपारी 3 वाजल्यापासून निघालेली मिरवणूक तब्बल आठ तासांहून अधिक काळ रंगली.
गुलालाची उधळण, बेंजो, ढोल-ताशांच्या दणदणाटाने रंगलेल्या मिरवणुकीवर सायंकाळनंतर किरकोळ पाऊस पडला. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी झाली होती. जंगी मिरवणुकीमुळे एसटी स्थानकापर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.

श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक मंडळाने यंदा लेक वाचवा या संकल्पनेवर मंडपामध्ये विविध फलकांद्वारे संदेश दिले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले होते. या मंडळाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत दुपारी आरती, गाऱ्हाणे झाल्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्‍टरवर बाप्पांची मूूर्ती विराजमान झाली. सामंत यांनीही ढोलवादनाचा आस्वाद घेतला. कल्याण-मुंबईतील ढोलपथक, कणकवलीतील महिलांचे ढोल-ताशा पथकाने मिरवणूक गाजवली. मिरवणूक पुढे सरकू लागली आणि मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होऊ लागली.
 
सायंकाळी 4 च्या सुमारास रत्नागिरीचा राजा आठवडा बाजार येथून सवाद्य मिरवणुकीने निघाला. राम आळीमार्गे मांडवीपर्यंत मिरवणूक पुढे निघाली. प्रचंड गर्दी, ढोल-ताशा पथके, झांजपथके, गुलालाची उधळण आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीने भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. "रत्नागिरीचा राजा‘ची देखणी व भव्य गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती.
 
महापुरुष पोलिस बॉइजचा अर्थात पोलिस मुख्यालयाच्या राजाचेही आज जल्लोषी मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले. एरवी खाकी वर्दीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी बेंजोच्या तालावर मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला. गुलालाची उधळण करीत मिरवणूक मांडवीत पोचली.

Web Title: Two kings of the parade eight hours immersed in Ratnagiri