रत्नागिरी जिल्ह्याच्या पदरात दोन मंत्रिपदे? 

Two Minister Posts To District Ratnagiri Marathi News
Two Minister Posts To District Ratnagiri Marathi News

देवरुख ( रत्नागिरी ) - राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार 30 डिसेंबरला होणार आहे. या विस्तारात रत्नागिरी जिल्ह्याच्या पदरात दोन मंत्रिपदे पडण्याची शक्‍यता आहे. यामुळे या विस्ताराकडे सर्वांचेच डोळे लागून राहिले आहेत. 

रत्नागिरीत कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. त्यामुळे कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेसला मंत्रीपद शक्‍य नाही. जिल्ह्यातील 5 पैकी 4 आमदार शिवसेनेचे असून यात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि राजापूरचे राजन साळवी यांच्यात मंत्रिपदासाठी जोरदार चुरस आहे. शिवसेना संघटनेतील वजन पाहता सामंत यांचा प्रभाव अधिक आहे. मातोश्रीचा आशीर्वाद सामंत यांना मिळण्याची शक्‍यता आहे. 

भास्कर जाधव यांचेही नाव चर्चेत

निवडणुकीआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून स्वगृही परतलेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचेही नाव शर्यतीत आहे. स्वतःच्या करिष्म्यावर जाधव मंत्रिपद पदरात पाडून घेऊ शकतात. पाच वर्षे राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार होते. त्या वेळी शिवसेनेला कमी मंत्रिपदे मिळाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातून निवडून आलेल्या एकाही आमदारांची मंत्रिपदावर वर्णी लागली नव्हती. सुभाष देसाई, रामदास कदम हे दोन राज्यात कॅबिनेट मंत्री होते. मात्र, ते विधानपरिषदेचे आमदार होते. चारवेळा विस्ताराच्या घोषणा झाल्या. मात्र, शेवटपर्यंत कुणालाही संधी मिळाली नाही. 

हेही वाचा - संभाजी भिडे म्हणाले, कोण सांगितले मला पुणे जिल्हा बंदी... 

मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार.. 

यावेळचे सरकार हे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली बनले आहे. कोकण आणि शिवसेना यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे यावेळी जिल्ह्यातील हक्काच्या मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार, हे नक्की आहे. 

मंत्रिपदासाठी त्यांच्याही नावाची चर्चा 

जिल्ह्यात पाचपैकी एकमेव आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पत वाचवली. मंत्रिपदासाठी त्यांच्याही नावाची चर्चा सध्या सुरु आहे. संघटनेला बळकटी द्यायची असल्यास निकम यांना मंत्रिपद मिळणे गरजेचे असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com