
-राजेंद्र बाईत
राजापूर : रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये यापूर्वी आठ काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध लागलेला असताना आता पुन्हा एकदा नव्याने रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये दोन नव्या काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध लागला आहे. निरुपद्रवी प्रकारातील ही बुरशी असून साधारणपणे जंगलामधील झाडांच्या पानांवरती आढळून येते. बुरशींच्या प्रजाती या नव्या प्रजातीच्या बुरशी जंगली जस्मिन आणि तांबूट या वृक्षांच्या पानावरती आढळतात.