दिलासादायक बातमी ; 'त्या' व्यक्तीला भेटलेल्या दोघांचे अहवाल निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या खेड मधील  त्या व्यक्तीला तो परदेशातून आल्यावर भेटण्यास गेलेल्या दापोली शहरात राहणाऱ्या त्याच्या दोन नातेवाईकांना 8 एप्रिल रोजी रात्रीच खबरदारीचा उपाय म्हणून दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते व त्यांच्या स्वँबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले होते. 

दापोली : खेड येथे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या त्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेलेल्या दापोलीतील त्याच्या नातेवाईकांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दापोलीतील प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला असून या दोघांनाही आता संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या खेड मधील  त्या व्यक्तीला तो परदेशातून आल्यावर भेटण्यास गेलेल्या दापोली शहरात राहणाऱ्या त्याच्या दोन नातेवाईकांना 8 एप्रिल रोजी रात्रीच खबरदारीचा उपाय म्हणून दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते व त्यांच्या स्वँबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले होते. 

खेड येथील त्या व्यक्तीचा कोरोनामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या मृत्यूमुळे कोरोना आपल्याजवळ येऊन ठेपला असल्याची जाणीव सर्वांना होऊ लागली आहे. 

मृत्युमुखी पडलेल्या या व्यक्तीला काही दिवसांपूर्वीच दापोली शहरातील फॅमिली माळ परिसरातील दोघेजण भेटून आल्याची माहिती 8 एप्रिल रोजी रात्री प्रशासनाला मिळताच, प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली, रात्रीच या दोघांनाही खबरदारीचा उपाय म्हणून दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशसन कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्या स्वँबचे नमुने घेऊन ते तपासणीला पाठविण्यात आले होते.

या दोन व्यक्ती राहत असलेल्या इमारतीचे निर्जंतुकीकरण दापोली नगरपंचायतीकडून करण्यात आले होते.  या इमारती समोरील रस्त्यावर जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली होती.

दरम्यान, फॅमिली माळ परिसरातील गटारेही  नगरपंचायतीच्या स्वछता विभागाच्या कर्मचार्यांनी साफ केली होती. 

हे पण वाचा - होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या वृद्धाचा मृत्यू ; यंत्रणेची उडाली झोप 

खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीत राहणाऱ्या 85 जणांची तपासणीही  करण्यात येणार होती. या सर्व प्रकारामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले होते तर दापोलीतील नागरिकामध्येही भीतीचे वातावरण पसरले होते.

यामुळे दापोली शहरातील बाजारपेठ तसेच तालुक्यातील मोठया गावांमधील बाजारपेठ अत्यावश्यक दुकाने वगळून आज व उद्या बंद ठेवण्यात येणार होती. आज दापोली शहरातील औषधाची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आज कोणीही दिसत नव्हते, शहरात आज नगरपंचायतीच्या वतीने जंतूनाशकाची फवारणीची करण्यात येत होती, या दोघांचा रिपोर्ट काय येतो त्याकडे प्रशासन व दापोलिकरांचे लक्ष लागले होते, मात्र या दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

हे पण वाचा -  'चोर आले' हा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला अन् लॉक डाऊन झालेली शांत गावं जागी झाली... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two people report negative corona virus