'चोर आले' हा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला अन् लॉक डाऊन झालेली शांत गावं जागी झाली...

 thief has come this message  has gone viral on social media
thief has come this message has gone viral on social media

लेंगरे (सांगली) - सायंकाळी नऊची वेळ...  दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी वेजेगांव (ता.खानापुर) जवळ असणाऱ्या मोरे मळ्यातील टाँन्सफार्मरवर दगडफेक करुन वीजपुरवठा बंद करत चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना मोरे मळ्यातील लोकांनी पळवून लावले.या अज्ञात चोरट्यांना पळवून लावल्यानंतर सोशल मिडीयावर चोरटे आल्याचा संदेश व्हायरल झाला अन् गावा गावाच्या सिमेवर तरुणांची फौज तैनात झाली.अगोदरच लाँकडाऊन सगळे व्यवहार ठप्प आहेत.शेतकरी शेतातील वस्तीवर होम क्वाॅरंटाईन असताना चोरीच्या घटनेमुळे त्यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहेत.

संचारबंदी,लाँकडाऊनमुळे चोवीस तास ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांंवर या चोरट्याना थोपविण्याचे नवीन आवाहन उभे राहिले आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरी भागासह ग्रामीण भागातही सर्वत्र लाँकडाऊन केल्यामुळे सर्व लोक घरीच थांबून आहे.ग्रामीण भागातील लोक शेतीच्या कामासाठी शेतात गुंतून पडले आहेत.शेतीचे कामे करण्यासाठी रोजगारी मिळत नसल्याने शेतकरी एकटाच शेतात राबताना आहेत.गावात राहणारे बरचशे लोक कोरोनाच्या भितीने शेतातील वस्तीवर राहण्यास गेले आहेत.वाड्या वस्त्यावर राहणारे लोकांच्यात या अज्ञात चोरट्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

 लाँक डाऊनचा फायदा घेत चोरट्यांनी वाडी वस्त्या वर तुरळक लोकसंख्येच्या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे लोक चांगलेच धास्तावले आहेत.वेजेगांव जवळील मोरे मळ्यात आठ ते दहा घरांची वस्ती आहे.रात्री अचानक दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या हेतुने विद्युत टाँन्सफार्मरवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.या दगडफेकीच्या आवाजामुळे जवळच राहत असलेले घरातील लोक बाहेर आले.लोक आलेले पाहून चोरट्यांनी दावण मलिक डोंगराजवळील वन विभागाच्या फाँरेस्टच्या दिशेने पळून गेले.त्यानंतर मळ्यातील लोकांनी ज्या दिशेने चोरट्यांनी धुम ठोकली होती.त्या दिशेला  वलखड,भिकवडी,वेजेगांव येथील लोकांना माहिती देत,सोशल मिडीयावर चोरटे आल्याचा संदेश व्हायरल केला.त्यामुळे ज्या त्या गावातील लोक,तरुण गावच्या सिमेवर काठ्या घेऊन तैनात झाले.

 'चोर आले' या एका संदेशाने लाँकडाऊनमुळे शांत असलेली गावे जागी झाली.गावात गस्त घालू लागले. यानंतर तिन्ही गावातील पोलिस पाटलांनी पोलिस स्टेशनला माहिती देत गस्त घालावी अशी मागणी केली.चोर आल्याचा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झालेला संदेश तालुक्याच्या काना कोपऱ्यात पोहचल्याने ग्रामीण भागातील सर्वच गावात सतर्कता बाळगण्यात आली.

चोरटे आल्याचे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल न करता ग्रामस्थ,संबंधित गावच्या पोलिस पाटलांनी तात्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.व्हायरल होणाऱ्या संदेशामुळे इतर गावात भितीचे वातावरण पसरत आहे.त्यामुळे लाँक डाऊन,संचारबंदी मोडून लोक एकत्र येण्याचे प्रकार वाढीस लागत आहे.त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी न ऐकणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करावे लागतील असा इशारा पोलिस निरिक्षक रविंद्र शेळके यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com