कातडे तस्करीत गुहागरचे दोघे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

गुहागर - गुहागर तालुक्‍यातून आणलेल्या बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या टोळीचा वसईत भांडाफोड करण्यात पालघर पोलिसांना यश आले. पालघर गुन्हे प्रतिबंधक पथकाने या टोळीतील ४ जणांना शनिवारी (ता. ३) सापळा रचून जेरबंद केले होते. त्यामध्ये गुहागरमधील २ जणांचा समावेश आहे. याबाबत वालीव पोलिस ठाण्यात वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल आहे. 

अटकेतील संशयितांमध्ये गजानन कृष्णा देसाई आणि अर्जुन तायडे हे दोघे मिरारोडचे रहिवासी आहेत. तर अशोक येद्रे आणि प्रवीण वाझे हे गुहागरमधील आहेत. अशोक येद्रे नरवण येथील दशभुज ट्रॅव्हल्स एजन्सीचा मालक आहे. प्रवीण वाझे हा ट्रॅव्हल्सचा कर्मचारी आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना मिळाली आहे. 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलमध्ये हे आरोपी बिबट्याची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार हॉटेलमध्ये सापळा लावला. एपीआय सुरेंद्र शिवदे यांनी वेटरचा वेश परिधान करून पाळत ठेवली. आरोपी मोटारसायकलवरून हॉटेलमध्ये आल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर झडप टाकून पकडले. झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे बिबट्याची कातडी मिळाली. त्या कातडीवर २ गोळ्या लागल्याच्या खुणा आहेत.

२२० सेंमी लांब कातडे
बिबट्याची कातडी २२० सेंमी लांब, ८८ सेंमी लांबीचे शेपूट, २७ सेंमी लांबीचे पुढचे पाय, ३३ सेंमी लांबीचे मागचे पाय आणि ९७ सेंमी छातीचा भाग आहे. या बिबट्याची शिकार गुहागर तालुक्‍यात झाली आहे काय? झाली असेल तर कुणी केली? व ती मुंबईमध्ये कशी आणली कुणाला विकणार होते, याचा तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: two smugglers of Guhaagar arrested

टॅग्स