चिपळुणात पुराचा हाहाकार; एका महिलेचा मृत्यू, एक बेपत्ता

चिपळुणात पुराचा हाहाकार; एका महिलेचा मृत्यू, एक बेपत्ता
Summary

मुसळधार पावसामुळे शहरात दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

चिपळूण (रत्नागिरी): चिपळूण, शहरात पावसाचा जोर असल्याने पूरपरिस्थिती कायम आहे. पाण्याची पातळी वाढत आहे. मुसळधार पावसामुळे शहरात दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एक महिला पाण्यात बुडाली असून दुसरी वाहून गेल्याची माहिती आहे. एकविरा मंदिर परिसरात राहणाऱ्या एका कुटूंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना एका वयोवृध्द महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

चिपळुणात पुराचा हाहाकार; एका महिलेचा मृत्यू, एक बेपत्ता
Konkan Rain - रत्नागिरी जलमय; पुराचे पाणी रस्त्यावर

संबंधित माहिला सदनिकेत एकटी राहत होती. पाणी वाढत असताना तिला अंदाज आला नाही. सदनिकेत पाणी वाढल्यानंतर जीव वाचवण्यासाठी ती घराबाहेर पडली, तेव्हा पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. संबंधित माहिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. बेंदरकर आळी येथील एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

चिपळुणात पुराचा हाहाकार; एका महिलेचा मृत्यू, एक बेपत्ता
Konkan Rain: रत्नागिरी जिल्ह्यात कुठे काय घडलंय; वाचा सविस्तर

पुराचा सामना करण्यासाठी चिपळूण नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सज्ज होती. तीन बोटी लाईफ जॅकेट दोरखंड बोये आणि इतर सामग्री आपत्कालीन यंत्रणेत समावेश होता. सदरची यंत्रणाही इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरातील अग्निशमन केंद्रात ठेवण्यात आली होती. अग्निशमन केंद्रही पाण्याखाली गेल्यामुळे पालिकेची आपत्कालीन यंत्रणा नाही. पुराच्या पाण्यात अडकले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांचे फोन लागत नाही. पालिका परिसरही पाण्यात गेला आहे, त्यामुळे पालिकेतील अधिकारी चिपळूण पोलीस ठाण्यात आले आहेत. पोलिस ठाण्यातून शक्य होईल तेवढे मदत कार्य सुरू आहे.

चिपळुणात पुराचा हाहाकार; एका महिलेचा मृत्यू, एक बेपत्ता
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

मुरादपुर पेठमाप मजरेकाशी शंकरवाडी देसाई मुल्ला महाराष्ट्र हायस्कूल परिसर दादरकर मोहल्ला येथील बैठ्या घरांच्या छतापर्यंत पाणी गेले आहे. अनेक कुटुंबे अपार्टमेंटच्या छतावर जीव वाचवण्यासाठी गेली आहेत. प्रत्येकाला मदत हवी परंतु संपर्क यंत्रणा गप्प झाल्याने आणि पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहेत. शहरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी खाजगी बोटींची मागणी करण्यात आली. परंतु पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे या पाण्यातून बोटी चालवणे शक्य नाही, त्यामुळे खाजगी बोटी चालकांनी आपल्या बोटी पाण्यात घालण्यास नकार दिला

चिपळुणात पुराचा हाहाकार; एका महिलेचा मृत्यू, एक बेपत्ता
रत्नागिरी, सिंधुदुर्गात धुवांधार; म्हाळुंगेत घराला तडे

चिपळूण पालिका आणि अपरांत रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने खेडेकर क्रीडा संकुल येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यात २१ रुग्ण आहेत येथील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आहे. सेंटरच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका वाहून गेली आहे. कोवीड सेंटरच्या चारही बाजूने पाणी असल्यामुळे आत प्रवेश करणे शक्य नाही, त्यामुळे रुग्णांना दुपारचे जेवण असो किंवा इतर मदत कार्य करण्यास अडथळे येत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com