कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

काही काळ रजपूतवाडी वडणगे, तर केर्ली कुशिरे वडणगे अशी वाहतूक सुरू झाली.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी

प्रयाग चिखली (कोल्हापूर): कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर रजपूतवाडी जवळ हॉटेल सई समोर वडाचे झाड कोसळल्याने दोन तास वाहतूक कोंडी झाली. काही काळ रजपूतवाडी वडणगे, तर केर्ली कुशिरे वडणगे अशी वाहतूक सुरू झाली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने झाड तोडून जलदगतीने वाहतूक सुरू केली. पण कोल्हापूर जाणारा चाकरमानी यांची वेळेवर जाण्यासाठी दमछाक झाली. तर रजपूत वाडी वडणगे निम्मा रस्ता कच्चा असल्याने रस्त्यावर चिखलाचा खच पडला होता. तर केर्ली कुशिरे वडणगे मार्गे पाच किलोमीटर अंतर जास्त जावं लागत होतं. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोकांनी आडवं झाड कापून लवकर वाहतूक कोंडी होणार नाही, यांची दक्षता घेवून मोठ्या वाहनांना वाट मोकळी केली.

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर वडाची झाडे छत्रपती शाहू महाराज यांनी कैद्यांकडून लावली आहेत. ही झाडे फारच जीर्ण झाली आहेत. त्यामुळे वर्षातून एकदा तरी कोणते तरी झाड उन्मळून पडते. अशी जीर्ण झाडे पावसाळ्यापुर्वी काढावी, अशी मागणी लोकांच्या कडून होत आहे.

टॅग्स :Kolhapur