कोकणात या दोन वाड्यांचा संपर्क तुटला कोठे वाचा....

 two village loose contact in Konkan
two village loose contact in Konkan

खेड(रत्नागिरी ) :  गेल्या चार दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी सायंकाळच्या सुमारास नातूनगर येथील घागवाडी व खोंडेवाडी येथे दरड कोसळल्याने दोन्ही वाड्यांचा संपर्क तुटला आहे. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही.

प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तुळशी - विन्हेरे मार्गावरचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी डोंगर पोखरून मातीचे बेसुमार उत्खनन करण्यात आले आहे. यामुळेच दरडी कोसळण्याचा धोका कायम असून ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.

रविवारी कोसळलेल्या दरडींमुळे दोन्ही वाड्याच्या संपर्क तुटल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली होती.  दरडी मुळे नजीकच्या वाड्याना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून स्थानिक ग्रामस्थांना करण्यात आल्या आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com