Two-wheeler riders Trouble sawantwadi sindhudurg
Two-wheeler riders Trouble sawantwadi sindhudurg

बेफीकीरी... सावंतवाडीत दुचाकीस्वारांचा असा प्रताप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरानंतर ग्रामीण भागातही दुचाकीवर बंदी आणली; मात्र शहरात यांची अंमलबजावणी होताना ग्रामीण भागात या नियमाला हरताळ फासण्यात येत आहे. दुचाकीवर बंदी असतानाही कोणतीही तमा न बाळगता रस्त्यावर लोकांचा दुचाकीवरून मुक्‍त संचार सुरू आहे. 

"कोरोना' विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रसानाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. संचारबंदीचे आदेश काटेकोरपणे पाळताना जनतेकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिवस्तीत दुचाकीवर बंदी आणली होती. त्यानंतर रातोरात शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवतांना या नियमाचे काटेकोर पालन करण्यात येत होते. त्यामुळे पहिल्या दिवशी कामाशिवाय रस्त्यावर फेरफटका मारण्याच्या संख्येत बऱ्याच प्रमाणात घट झाली होती.

त्यामुळे शहराच्या ठिकाणी दिसणारी गर्दी कमी झाली होती. प्रशासनाकडून दुकाची बंदीचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रीयाही सर्वस्तरातून होत होती. दुचाकीवर बंदी आणल्यानंतर संचारबंदीचे पालन करताना प्रशासनाला सोपे जात होते. त्यामुळे नागरीवस्तीनंतर दुसऱ्या दिवसापासून ग्रामीण भागातही हा नियम लागु होता; मात्र ज्याप्रमाणे संचारबंदीला ग्रामीण भागात हरताळ फासणयात येत आहेत. त्याचप्रमाणे दुचाकी बंदीच्या निर्णयालाही लोकांकडून धुडकावले जात आहे.

ग्रामीण भागाचा विचार करता काही गावांनी स्वतःलाच नियम घालुन घेत संचारबंदीचे तसेच कोरोनाबाबत घेण्यात येणाऱ्या काळजीचे काटेकोर पालन केले आहे व करत आहेत; मात्र काही गावात याकडे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे. आजही काही गावात मटणाच्या पार्ट्या, क्रिकेट खेळतांना तरूण युवक दिसत आहेत. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी कडक अंबलबजावणी होणे गरजेचे आहे. बीट अंमलदार, पोलिस पाटील यांच्या मार्फत याबाबत उपाययोजना आखणे गरजेचे आहे. असे झाल्यास ग्रामीण भागातही संचारबंदीबाबत बदल दिसुन येणार आहे. 

सावंतवाडीत कडक बंदोबस्त 
सावंतवाडीचा विचार करता दुचाकीबंदीची अंबलबजावणी करताना काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. शहरात येणाऱ्या सर्वच सीमा बंद केल्या आहेत; मात्र असे असले तरी ई पासचा वापर करून काही दुचाकी शहरात दिसुन येत आहेत. तरीही प्रत्येक दुचाकीची तपासणी करूनच सोडण्यात येत असल्याने कामाशिवाय कोणीच बाहेर पडत नसल्याचे दिसते. शहरातील चिटणीस नाका, बाहेरचावाडा, बुर्डी पुल, मोरडोंगरी, माजगाव नाका आदी ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com