Sindhudurg : मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा जागीच मृत्यू

पेंडुर- सातवायंगणी येथे सूरु असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी ही घटना घडली.
sindhudurg
sindhudurgesakal

वेंगुर्ला: तालुक्यातील पेंडुर- सातवायंगणी (Pendur ) येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकाम ठिकाणी मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा (Workers) मृत्यू झाला. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोपिलाल रामू राठोड (५२), ओमप्रकाश तेजुनायक राठोड (३२) अशी कामगारांची नावे असून हे मूळ राहणार कर्नाटक (Karnataka) यादगीर व सध्या पुलाच्या कामानिमित्त पेंडुर येथे राहत होते.

येथील पेंडूर- सातवायंगणी येथे नदीवर नुतन पुलाचे बांधकाम सुरू असताना ही मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाच्या फाउंडेशनचे काम पूर्ण झाले होते तर त्या फाउंडेशनला लावलेल्या फाडया काढायला दोन कामगार गेले असता वरून मातीचा ढिगारा कोसळला व या ढिगाऱ्यात ते दोन्ही कामगार गाडले गेले. खाली चिखल असल्याने त्यात अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Summary

फाडया काढायला दोन कामगार गेले असता वरून मातीचा ढिगारा कोसळला व या ढिगाऱ्यात ते दोन्ही कामगार गाडले गेले.

दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी कांबळी, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दाभोलकर, सुरेश पाटील, बंटी सावंत, चोडणकर, अमर काडर यांच्यासाहित पोलिस पथक दाखल होऊन पोकलँडच्या साहाय्याने मातीचा ढिगारा बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांकडून देण्यात आली आहे.

sindhudurg
वेंगुर्ला- वायंगणीत अग्नितांडव ; वडील व मुलाचा जागीच मृत्यू

दरम्यान ही माहिती समजताच पेंडूर सरपंच गितांजली कांबळी, मातोंड सरपंच जानवी परब, सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी, माजी सरपंच संतोष गावडे, पेंडूर उपसरपंच प्रमोद शिरोडकर, ग्रा प सदस्य निलेश वैद्य, महेंद्र नाईक, मातोंड ग्रा प सदस्य सुभाष सावंत, सामाजिक कार्यकर्ते जगदीश परब, बबलू पेडणेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com