समुद्र खडकात मासे पकडणे दोन तरुणांच्या बेतले जीवावर

समुद्र खडकात मासे पकडणे दोन तरुणांच्या बेतले जीवावर

गुहागर (रत्नागिरी): तालुक्यातील पाचमाड (pachmad)येथील खडकाळ परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. मासेमारी करताना तोल जाऊन एक जण समुद्रात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही समुद्रात पडला. लाटांमुळे येथील खडकांवर आपटून दोघेही जखमी झाले अन् बुडाले. दोघांचे मृतदेह आज गुहागरच्या (Guhagar)समुद्रावर वेगवेगळ्या ठिकाणी मिळाले. आरेगावातील (Aaregawatil)सिद्धांत संदेश साटले (वय २३, रा. कलमवाडी) आणि प्रतीक किसन नावले (वय २५, रा. नागदेवाडी) अशी त्यांची नावे आहेत. two-young-men-died-incident-at-pachmarhi-kokan-marathi-news

दोन दिवस वेगवेगळ्या प्रकारची मच्छी मिळाली म्हणून सलग तिसऱ्या दिवशी मासेमारीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा घात झाला. गुहागर बाग, पाचमाड ते रानवीच्या डोंगराखालील खडकात या दिवसांत समुद्रातील वेगवेगळ्या प्रजातींचे मासे मिळतात. या चविष्ट माशांना किंमतही खूप मिळते. त्यामुळे या दिवसांत अनेक जण बाग ते रानवी परिसरातील समुद्रकिनाऱ्यानजीकच्या खडकाळ भागात मासे पकडायला जातात.

गुहागर तालुक्यातील आरेगावातील सिद्धांत साटले आणि प्रतीक नावले हे दोन तरुणदेखील गेले तीन दिवस याच पद्धतीने मासेमारीसाठी जात होते. सोमवारी (ता. २१) ते मासे पकडण्यासाठी गेले. सायंकाळपर्यंत ते परत आले नाहीत म्हणून दोघांचे मित्र पाचमाडात गेले. तेथे दुचाकीमध्ये मोबाईल ठेवून हे दोघे मासे गरवायला गेले होते. शोध घेणारी मंडळी खडकापर्यंत जाऊन आली. रात्री भरतीच्या वेळी ते दोघे जिवंत सापडतील, अशी आशा होती म्हणून साडेबारा वाजेपर्यंत शोध सुरू होता. मंगळवारी (ता. २२) पहाटे पाच वाजल्यापासून पुन्हा शोध सुरू केला. अखेर मंगळवारी सकाळी गुहागर पोलिसांमध्ये सिद्धांत व प्रतीक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान गुहागर वरचापाट मोहल्ला येथील समुद्रकिनाऱ्यावर सिद्धांतचा मृतदेह सापडला तर बाजारपेठ परिसरात प्रतीकचा मृतदेह सापडला. दोघांच्या डोक्याला, शरीरावर जखमा होत्या. त्यावरून त्यांनी खडकामध्ये समुद्रातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे लक्षात येत होते. शवविच्छेदन करून सायंकाळी दोघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक दीपक कदम आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पवार अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com