

आजचे वैरी उद्याचे मित्र! कोकणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
esakal
Uddhav Thackeray and Eknath Shinde Allience : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपविरोधात शहर विकास आघाडी स्थापन होण्याबाबतची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात दोन्ही शिवसेना तसेच काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने गेले चार दिवस विविध राजकीय पक्षनेत्यांच्या निवासस्थानी बैठका झाल्या; मात्र अंतिम निर्णय उद्या (ता. ८) होण्याची शक्यता आहे. या नव्या समीकरणाच्या केंद्रस्थानी माजी नगराध्यक्ष संदेश पारकर आहेत.