Uddhav Thackeray Raigad Visit : उद्धव ठाकरे यांचा रायगडमध्ये दोनदिवसीय दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आणि दोन फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात सहा झंझावाती जाहीर सभा घेणार आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal

रोहा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आणि दोन फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात सहा झंझावाती जाहीर सभा घेणार आहेत.

येत्या गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात विशेषतः रोह्यात देखील उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या भव्य अशा होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

रोहासहित संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या सभांमुळे शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला आहे. यावेळी ते पोलादपूर, म्हसळा, माणगाव, अलिबाग, रोहा आणि पेण येथे विभागवार सभा घेणार आहेत. सध्या सभेचे नियोजन करण्याचे काम सध्या वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे. उद्धव ठाकरे शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com