नाणारची जमीन संपादन अधिसूचना रद्द होईल - उद्धव ठाकरे

नाणारची जमीन संपादन अधिसूचना रद्द होईल - उद्धव ठाकरे

राजापूर - रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्‍यक त्या जमिनीचे संपादन करण्यासाठी काढण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग विभागाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. त्यावर निर्णय होऊन लवकरच अधिसूचना रद्द होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आश्‍वासित केले.

रिफायनरी प्रकल्पविरोधी समित्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली त्यावर ते बोलत होते. तालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासंबंधी लोकांची मते जाणून घेण्यासाठी आलेल्या सुकथनकर समितीसमोर आक्रमक झालेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी आता भूसंपादन अधिसूचना रद्द करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातून अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने प्रकल्पविरोधी समित्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 

रिफायनरी प्रकल्पविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम, सचिव भाई सामंत, सरपंच पंढरी मयेकर, बाळा हळदणकर, भडेकर, कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम, नितीन जठार, शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, चंद्रप्रकाश नकाशे आदी उपस्थित होते. 

मच्छीमार संघटनेचे सचिव सामंत यांनी प्रकल्पग्रस्तांची भूमिका मांडताना मुख्यमंत्र्यांकडे उद्योग खात्याकडून पाठविण्यात आलेल्या भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याच्या प्रस्तावावर लवकर निर्णय होऊन भूसंपादन अधिसूचना रद्द व्हावी, अशी मागणी केली. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिसूचना रद्द करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे भूसंपादनाची अधिसूचना रद्द होईल, असा ठाम विश्‍वास वाटतो. ‘मातोश्री’वर झालेल्या चर्चेबाबत समाधानी आहोत.
- कमलाकर कदम,
रिफायनरीविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com