

Insurance Shield for Coconut and Arecanut Farmers Under PMFBY
esakal
-राजेंद्र बाईत, राजापूर
राजापूर : हवामान बदल आणि कीडरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील नारळ व सुपारी बागायती मोठ्या संकटात सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नारळ व सुपारी पिकांचा समावेश करून यंदापासून विमा संरक्षण लागू केले आहे. त्यामुळे उत्पादनातील घट आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जाणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदारांना मोठा आधार मिळणार आहे.