उज्ज्वला गॅस योजनेत गोलमाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

वैभववाडी - उज्ज्वला गॅस योजनेच्या यादीत धनाढ्यांचा समावेश आहे. त्यामुळे खराखुरा लाभार्थी योजनेपासून वंचित राहिला आहे. या योजनेत गोलमाल असून त्याची व्याप्तीसुद्धा मोठी आहे. या योजनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी येथील दक्षता समिती सभेत दिली.

तालुका दक्षता समितीची सभा आमदार श्री. राणे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात झाली. सभेला तहसीलदार संतोष जाधव, सभापती शुभांगी पवार, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, सदस्य सदानंद रावराणे, श्रीराम शिंगरे, अनंत फोंडके, सुविधा रावराणे, स्वप्नील प्रभू उपस्थित होते.

सभेत सदस्य श्री. रावराणे यांनी उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ धनाढ्य लोक घेत आहेत. या योजनेची तयार केलेली यादी सदोष आहे. या याद्याचे वाचन ग्रामसभेत केलेले नाही. यामुळे गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिला आहे. या योजनेची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. याबाबत आमदार श्री. राणे म्हणाले, ‘‘या योजनेत सर्वत्र गोलमाल झाला आहे. तो नेमका कुणामुळे झाला आहे. याचा शोध घेणे आवश्‍यक आहे. या योजनेच्या यादीत अनेक राजकीय पक्षातील धनाढ्यांचा नावे आहेत. मात्र त्यामध्ये कुणीही असले तरी आपण कसलाही मुलाहिजा न बाळगता या  प्रकरणात लक्ष घातलेला आहे. हा विषय वैभववाडी तालुक्‍यापुरता मर्यादित नाही. तर याची व्याप्ती राज्यभर आहे. त्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेची इत्यंभूत माहिती घेऊन सखोल चौकशी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या याद्या कुणी बनविल्या, त्या एजन्सीकडे कुणी दिल्या. याची पुरवठा शाखांना माहिती का दिली नाही या सर्वांची चौकशी केली जाईल.’’

ग्राम दक्षता समितीच्या सभाच होत नाही. तलाठ्यांना वारंवार सूचना करून देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अकार्यक्षम व सभा लावण्यास टाळटाळ करणाऱ्या तलाठ्यांवर निलबंनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रांताकडे पाठवावा, अशी मागणी सदस्य श्री. रावराणे यांनी केली. त्याला आमदार श्री. राणेनी ही सहमती दर्शवित तहसीलदारांना तत्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचना केली. पुढच्या दक्षता समितीत किती अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली याची माहिती द्या असेही त्यांनी सांगीतले. या वेळी तहसीलदार श्री. जाधव यांनी अशा तलाठ्यांचा प्रस्ताव तत्काळ पाठविणार असल्याचे स्पष्ट केले.
 
सुट्ट्या पैशांबाबत बॅंकांना सूचना द्या
नोटाबंदीचा त्रास रास्त धान्य दुकानदार आणि ग्राहकांना होऊ नये याकरिता बॅंकांकडून शंभर, पन्नास रुपयांच्या अधिकाधिक नोटा धान्य दुकानदारांना मिळतील याची खबरदारी तहसीलदारांनी घ्यावी, अशी सूचना आमदार श्री. राणे यांनी दिली. या वेळी श्री. जाधव यांनी तशा प्रकारच्या सूचना दिल्या असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, नोटाबंदीनंतर शंभर, पन्नास रुपयाच्या नोटांचा तुटवडा जाणवत आहे; मात्र ठराविक लोकांना बॅंका या नोटा देत असल्याचा आरोप सदस्य सदानंद रावराणे यांनी आजच्या 
सभेत केला.

रिक्त पदांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार
शासकीय गोदामातील रिक्त पदे भरावित म्हणून सातत्याने सभेत मागणी केली जात आहे. परंतु ही पदे अद्याप भरलेली नाहीत. या वेळी आमदार श्री. राणे यांनी आपण अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधलेले आहे. येत्या तीन महिन्यात रिक्त पदे भरण्यात येतील, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. तरीदेखील जे प्रश्‍न तालुकास्तरावर सुटत नाही ते सोडविण्याच्या हेतूने दक्षता समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणू या, असे श्री. राणे यांनी सांगितले.

Web Title: Ujjwala gas plan breakup