सुधागडमध्ये सापडला अनोळखी तरुणाचा मृतदेह

अमित गवळे
सोमवार, 16 जुलै 2018

सुधागड तालुक्यातील नाणोसे येथील जि.प शाळेच्या प्रांगणात रविवारी (ता.15) एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे 22 वर्ष आहे.
 

पाली- सुधागड तालुक्यातील नाणोसे येथील जि.प शाळेच्या प्रांगणात रविवारी (ता.15) एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मृत तरुणाचे वय अंदाजे 22 वर्ष आहे.

नाणोसे पोलीस पाटील शेजल गायकवाड यांनी याबाबत जांभुळपाडा पोलीस दुरक्षेत्रात खबर दिली. सदर तरुण हा रंगाने सावळा, उंची 5 फुट 6 इंच, पेहराव निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आहे. हा तरुण कुठला असावा, कोण असावा व त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला ? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने पाली पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

अधिक तपास पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. एस.एस.खेडेकर करीत आहेत. सदर मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाची ओळख पटल्यास नातेवाईकांनी जांभुळपाडा अथवा पाली पोलीस स्थानकात दुरध्वनी क्रमांक 02142242223, मो.नं. 9850518125 या क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Unidentified youth body found in Sudhagad