
शहरातील फडके उद्यान येथे प्रसिद्ध नॅशनल मोबाईल विक्रेता मनोहर सखाराम ढेकणे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला.
रत्नागिरीत मोबाईल विक्रेत्यावर अचानक झाला गोळीबार अन....
रत्नागिरी : शहरातील फडके उद्यान येथे प्रसिद्ध नॅशनल मोबाईल विक्रेता मनोहर सखाराम ढेकणे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. अज्ञात पळून गेला.
ही घटना आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली असून खंडणीसाठी हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे. जखमी मनोहर ढेकणे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल दुकानाचे मालक मनोहर ढेकणे हे फडके उद्यान जवळील लक्ष्मी-नारायण अपार्टमेंटमध्ये राहतात. त्याचा मोबाईल संवाद सुरू होता. बििल्डंगखाली पार्किंगमध्ये दुचाकीजवळ ते बोलत असताना भरधाव चारचाकी मोटार तेथे आली. त्यातून एक संशयित खाली उतरला.
हेही वाचा - ...त्यामुळे झालीय शिवसेनेची कोंडी
त्याने अचानक त्यांच्यावर थेट गोळीबार केला. या हल्ल्यात मनोहर ढेकणे यांच्या पोटात गोळी लागली. ते खाली कोसळले. फायरिंगच्या आवाजाने बाजूचे लोक गोळा झाले. त्यांचा मुलगा राहुल तेथे आला. त्याने फायरिंग करून पळून गेलेल्या लोकांचा पाठलाग केला. मात्र ते पळून गेले. जखमी ढेकणे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबराची माहिती असताच शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड आणि त्यांचे सहकारी तातडीने घटना स्थळी पोचले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी पुराव्याच्या दृष्टीने झाडा झडती घेतली. मात्र तिथे काहीच हाती लागले नाही. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक शिरीष सासणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले.
हेही वाचा - विसरलेले लायसन्स मिळाले फेसबुकमुळे, कसे ?
सराईत गुन्हेगाराचे नाव पुढे
चौकशी सुरू असून यात सराईत गुन्हेगार सचिन जुमनाळकर याचे नाव प्राथमिक तपासात पुढे आले आहे. तो नुकताच एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयिताच्या मागावर पोलिस पथक रवाना झाले आहे.
Web Title: Unusual Firing Ratnagiri Mobile Vendors Ratnagiri Kokan Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..