शेतकऱ्यांनो चाऱ्याची पौष्टिकता वाढवायची आहे ? मग वाचा ही बातमी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

अस्मिता वारेकर हिचे प्रात्यक्षिक, कोतवडे या आपल्या गावी विविध उपक्रम राबवले

रत्नागिरी : भाताच्या पेंढ्यावर किंवा सुक्‍या गवतावर युरियाची रासायनिक प्रक्रिया केल्यास चाऱ्याची पौष्टिकता वाढवता येते, असे अस्मिता वारेकर हिने प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले. कोरोना टाळेबंदीमुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. कृषी पदव्युत्तर शिक्षणाच्या चौथ्या वर्षी ‘स्टुडंट रेडी’ (ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना) हा कार्यक्रम घेतला जातो. 

हेही वाचा - रेस्क्‍यू टीमच्या चार तासांच्या शोधाला आले यश ; आणि त्याचाही वाचला जीव

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी राबविण्यास सांगितले. या अंतर्गत अस्मिता वारेकर हिने कोतवडे या आपल्या गावी विविध उपक्रम राबवले. याचाच एक भाग म्हणून तिने गावातील शेतकऱ्यांना भात पेंढा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविले. भाताच्या पेंढ्यावर किंवा सुक्‍या गवतावर युरियाची रासायनिक प्रक्रिया केल्यास चाऱ्याची पौष्टिकता वाढवता येते. 

हेही वाचा - पर्यटकांचा आंबोली घाट बनतोय का ? या घटनांसाठी हॉटस्पॉट ?

पेंढ्यामधील प्रथिनांचे प्रमाण अडीच टक्‍क्‍यांवरून ८ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत वाढते. त्यामुळे प्रक्रियायुक्त पेंढा जनावरांना दिल्यास अधिक उपयुक्त ठरतो, असे तिने प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. या वेळी सागर सनगरे, राजेश धावडे, योगेश पवार, राजेश पवार, श्रद्धा सनगरे, सुलोचना कुवार, अविनाश धुंदुर, दिलीप वारेकर आदी शेतकरी उपस्थित होते. तसेच शेतात विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, त्यामुळे होणारे फायदे याची माहिती अस्मिता शेतकऱ्यांना देत आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: urea is useful to rice and grass increases invention of girl in ratnagiri