रिक्त पदे भरण्याठी संघर्ष सुरूच ठेवणार - बबन साळगावकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

सावंतवाडी - माकडतापाच्या पार्श्‍वभूमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरचा रिक्त पदांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जोपर्यंत ही पदे भरली जात नाहीत, तोपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहणार आहे, असा इशारा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी येथे दिला.

शहरात शून्य कचरा व्यवस्थापन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पायलट प्रोजेक्‍टसाठी सर्वोदयनगर निवडले आहे. या ठिकाणी हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे, असे ही श्री. साळगावकर यांनी सांगितले. 

श्री. साळगावकर यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, अनारोजीन लोबो, माधुरी वाडकर, भारती मोरे, मनोज नाईक आदी नगरसेवक उपस्थित होते. या वेळी श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘बांदा परिसरात सद्यस्थितीत माकडतापाने थैमान घातला आहे. ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनासह पालकमंत्री, खासदार, आमदार प्रयत्नशील आहे; परंतु अद्यापपर्यत या साथीवर नियंत्रण मिळविणे शक्‍य झालेले नाही. मंगळवारी (ता. १४) शहरातील काही नागरिकांतर्फे साथीच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेला निवेदन देण्यात आले. सद्यस्थिती लक्षात घेता सावंतवाडी शहराला या आजारापासून कोणताही धोका नाही; मात्र भविष्यात कोणतीही रिस्क नको म्हणून नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.’’ 

कुटिर रुग्णालयातील रिक्तपदाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘ही पदे भरण्याचे आश्‍वासन आरोग्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दिले होते. त्या प्रश्‍नात अन्य लोकांनी लक्ष घातला होता. त्यामुळे आपण लक्ष दिला नव्हता; मात्र आज सत्तेत असलो तरी नागरिकांचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. त्यामुळे कुटिर रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत यासाठी माझी संघर्षाची तयारी आहे आणि जोपर्यत हा प्रश्‍न सुटत नाही. तोपर्यत माझा संघर्ष सुरूच राहणार आहे.’’

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. आवश्‍यक असलेल्या जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे; परंतु लोकांनी आपल्या परिसरात मृत माकड आढळून आल्यास त्याची तत्काळ माहिती वनविभाग अथवा पालिकेला देणे गरजेचे आहे. तसेच या साथीचा आजार निर्माण करणाऱ्या गोचिड या माकड आणि कुत्र्यावर निर्माण होतात. त्यामुळे कुत्रे आणि माकड घराच्या जवळपास येऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी नागरिकांनी घ्यावी.
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष, सावंतवाडी

Web Title: Vacant posts will continue to struggle recruitment