esakal | 'सोमय्यांचे ब्लॅकमेलिंग, राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय?'
sakal

बोलून बातमी शोधा

'सोमय्यांचे ब्लॅकमेलिंग, राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय?'

'सोमय्यांचे ब्लॅकमेलिंग, राणेंच्या ED चौकशीचं पुढं काय?'

sakal_logo
By
- तुषार सावंत

कणकवली : मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना गुंतवण्यासाठी भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) हे ब्लॅकमेलिंग करत आहेत. यापूर्वी खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केलेल्या ईडीचे (ED) चौकशीचे काय झाले? असा सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी विचारला आहे.

हेही वाचा: 'अनिल परबांचे बांधकाम वाचवून दाखवाच!'

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावर नाईक म्हणाले, शिवसेना पक्ष (Shivsena) आणि नेत्यांवर तोंडसुख घेण्यासाठी किरीट सोमय्या पुढे आले आहे. अनिल परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. वडिलोपार्जित घर दुरुस्ती त्यांनी केली असून सिंधुदुर्गात त्यांची या व्यतिरिक्त एकही मालमत्ता नाही. मुंबई (Mumnbai) महानगरपालिकेमध्ये अनिल परब यांची ताकत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना गुंतवण्यासाठी अनिल परब यांच्यावर बेछूट आरोप करण्याचा प्रकार सोमय्या यांच्याकडून होत आहे.

हेही वाचा: 'ओबीसी आरक्षण कायम ठेवूनच निवडणुका घेणे हीच काँग्रेसची भूमिका'

पुढे ते म्हणाले, कुडाळ येथील एसटी डेपोचे काम २ कोटीचे होते. इंजिनियर कंपनीने हे काम केले, ते कोणाच्या जवळचे आहेत हे सर्वश्रुत आहे. जर २ कोटीचे काम असेल तर, अडीच कोटीचा घोटाळा कसा झाला ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. नारायण राणे यांच्या 53 कोटीच्या बेनामी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केली. नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाले कुठून? यात कोणाचा सहभाग आहे, याची चौकशी का थांबली ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. किरीट सोमय्या जर यापुढे मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर असे बेछूट आरोप करत राहिले तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही इशारा नाईक यांनी यावेळी दिला आहे.

loading image
go to top