esakal | 'अनिल परबांचे बांधकाम वाचवून दाखवाच!'; सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज
sakal

बोलून बातमी शोधा

'अनिल परबांचे बांधकाम वाचवून दाखवाच!'

परिवहन मंत्री अनिल परब यांनी सीआरझेडचे उल्लंघन करून दापोली समुद्र किनारी दोन बंगले बांधले.

'अनिल परबांचे बांधकाम वाचवून दाखवाच!'

sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली : परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली (Dapoli) येथील अनधिकृत रिसॉर्ट कोणत्याही परिस्थितीत पाडणारच. ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर ते वाचवून दाखवावे, असे आव्हान माजी खासदार आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी आज येथे दिले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले असून ते आता गायब केले आहेत अशीही टीकाही त्यांनी केली. प्रहार भवनमध्ये किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार नीतेश राणे, (Nitesh Rane) भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) आदी उपस्थित होते.

हेही वाचा: 'ओबीसी आरक्षण कायम ठेवूनच निवडणुका घेणे हीच काँग्रेसची भूमिका'

सोमय्या म्हणाले, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सीआरझेडचे (CRZ) उल्लंघन करून दापोली समुद्र किनारी दोन बंगले बांधले. यातील एक रिसॉर्ट १७ हजार स्क्वेअर फुटाचे आहे. दुसर्‍या बंगल्याचा तपशील अजून यायचा आहे. समुद्रपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर हे बांधकाम असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत पाडावेच लागणार आहे. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना आपले बांधकाम तोडावे लागले. त्याच धर्तीवर परब यांनाही आपले बांधकाम तोडावेच लागणार आहे. मुख्यमंत्री यांनी ते बांधकाम वाचून दाखवावे. त्यांना माझे खुले आव्हान आहे.

हेही वाचा: आमदाराचा लाजीरवाणा रेल्वे प्रवास; सहप्रवाशालाही शिवीगाळ

पुढे सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री मोठे घोटाळेबाज आहेत. त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे तब्बल १९ बंगले बांधले. एवढेच नव्हे तर ते गायबही केले आहेत. मात्र आम्ही या अनधिकृत बांधकामांचा शोध लावल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान संचयनी घोटाळ्यातील दोषींवर कारवाई व्हावी. यातील प्रमुख आरोपींची संपत्ती जप्त व्हावी आणि त्यामधून गुंतवणूकदारांना त्यांची ठेव मिळावी या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली. संचयनी घोटाळ्याचा तातडीने तपास सुरू करावा अशीही मागणी पोलिस अधीक्षकांना केली असल्याचे सोमय्या म्हणाले.

loading image
go to top