esakal | वैभववाडीतील 'ते' पदाधिकारी स्वगृही परतणार ; राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Political

भविष्यात सत्ता स्थापन करण्याची स्वप्न पाहणाऱ्या पक्षासाठी मोठी चपराक.

वैभववाडीतील 'ते' पदाधिकारी स्वगृही परतणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : मोठा गाजावाजा करून अन्य पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांपैकी काही पदाधिकारी परतणार असुन त्यांची एका स्थानिक नेत्याबरोबर प्राथमिक बोलणी देखील झाल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे त्या सदस्यांच्या ताकदीवर भविष्यात सत्ता स्थापन करण्याची स्वप्न पाहणाऱ्या पक्षासाठी ही मोठी चपराक मानली जात आहे.

तालुक्यातील एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही सदस्यांनी डांगोरा पिटत काही महिन्यापुर्वी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर मोठे शक्तीप्रदर्शन देखील त्यांनी केले होते; परंतु अवघ्या काही महिन्यात त्या सदस्यांपैकी काही सदस्य परतणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. एका स्थानिक नेत्याबरोबर त्यांची प्राथमिक बोलणी देखील झाली आहेत. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत त्यांना कोणत स्थान देण्यात येणार आहे. याची देखील चर्चा या गुप्त बैठकीत झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांचा स्वगृही परतीचा प्रवास निश्चित मानला जात आहे. येत्या काही दिवसात हे सदस्य पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आहे.

हेही वाचा: महावितरणचे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापनार

दरम्यान ज्या पक्षात त्या सदस्यांनी प्रवेश केला होता, त्या पक्षाचे पदाधिकारी या सदस्याच्या ताकदीवर भविष्यात होणारी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक जिंकण्याची स्वप्ने पाहत होते. त्या अनुषंगाने त्यांची मोर्चेबांधणी सुरू होती; परंतु काही सदस्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे आता त्या पदाधिकाऱ्यांची सत्ता मिळविण्याची स्वप्ने देखील भंगणार असल्याचे बोलले जात आहे. त्या पक्षाला ही मोठी चपराक ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासुन पक्षात प्रवेश केलेले ते पदाधिकारी आणि पक्षाचे जुने पदाधिकारी यांचा सुर जुळत नव्हता. पक्षाच्या वरिष्ठांनी देखील त्यामध्ये लक्ष घातले नाही. त्यामुळे त्यांच्यात वादाची दरी अधिकच वाढत गेली. पक्षात प्रवेश केलेले सदस्य नाराज होते. आगीतुन फोफाट्यात आल्याची त्यांच्यामध्ये भावना निर्माण झाली असुन त्यामुळेच त्यातील काही सदस्य आता पुन्हा स्वगृही परतणार असे बोलले जात आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीतील स्थानाबाबतची प्राथमिक बोलणी स्थानिक नेत्याबरोबर झाले असुन लवकरच प्राथमिक बोलणीचे रूपांतर लवकरच अंतिम बोलण्यात होणार आहे. त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.

loading image
go to top