Good News : मडगावमधून 'या' दिवशी धावणार बहुचर्चित 'वंदे भारत एक्स्प्रेस'; कुठे-कुठे असणार थांबा? जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्याची शक्‍यता आहे.
Vande Bharat Express
Vande Bharat Expressesakal
Summary

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जिल्ह्यात थांबा मिळवून देऊन जिल्‍हावासीयांना न्याय दिला आहे.

कणकवली : बहुचर्चित ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा (Vande Bharat Express) प्रारंभ शनिवारी (ता. ३) मडगाव स्थानकातून (Madgaon Station) होणार आहे. एक्स्प्रेसला कणकवली स्थानकात (Kankavali Railway Station) थांबा मिळाला आहे. त्‍यानंतर रत्‍नागिरी, खेड, पनवेल, ठाणे स्थानकांवर थांबून ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे थांबणार आहे.

मुंबई ते कणकवली प्रवास सहा तासांचा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्याची शक्‍यता आहे. प्रारंभ तीन जूनला होणार असला तरी ही गाडी नियमितपणे केव्हापासून धावणार, याबाबतच अद्याप निश्‍चिती नाही. मात्र, लवकरच मध्य रेल्‍वेकडून त्याची घोषणा होईल, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

दरम्यान, या गाडीचा प्रारंभ २९ मे रोजी होणार होता. त्‍यासाठी मडगाव स्थानकात सज्‍जता ठेवण्यात आली होती. या निर्णयाने सिंधुदुर्गवासीयांसाठी आणखी एक वेगवान गाडी उपलब्‍ध झाली आहे. सध्या राजधानीसह तेजस आणि जनशताब्‍दी एक्स्प्रेस या वेगवान गाड्या जिल्‍हावासीयांसाठी उपलब्‍ध आहेत. या सर्वांपेक्षा अधिक वेगवान आणि आरामदायी अशी वंदे भारत लवकरच धावणार आहे.

Vande Bharat Express
Central Railway : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-मिरज-पुणे एक्स्प्रेस 'या' दिवशी होणार सुरू

वंदे भारत ‍एक्स्प्रेसचा वेग ताशी १८० किलोमिटर आहे. यापूर्वी राज्‍यात मुंबई गांधीनगर, मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी मार्गावर ‘वंदे भारत’ धावत आहेत, तर चौथी गाडी मडगाव ते मुंबई या दरम्‍यान धावणार आहे. यामुळे सिंधुदुर्गवासीयांना कमी वेळेत मुंबई गाठता येणार आहे. मुंबईहून सहा तासांत सिंधुदुर्गात पोचता येणार आहे. ही गाडी भारतीय बनावटीची असून देशातील सध्याची अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जिल्‍हावासीयांमध्ये प्रचंड उत्‍सुकता आहे.

Vande Bharat Express
Kolhapur Crime : 'बोटं तोडली, आता तुला तोडणार..'; नंग्या तलवारी घेऊन थरारक पाठलाग, तरुणावर खुनी हल्ला

जिल्ह्यातील काही निमंत्रितांना घेऊन वंदे भारत शनिवारी मडगाव ते मुंबई अशी धावणार आहे. आज दुपारपर्यंत वंदे भारत एक्‍सप्रेसला सिंधुदुर्गात कुठेही थांबा नाही, असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होते. दुपारी आमदार नीतेश राणे यांनी कणकवली स्थानकात थांबा निश्‍चित झाल्‍याचे जाहीर केले. त्‍यानंतर कणकवली तालुकावासीयांतून आनंद व्यक्‍त करण्यात आला. कुडाळ आणि सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचीही मागणी तेथील प्रवाशांकडून होत होती.

Vande Bharat Express
Satara : अभिमानास्पद! नव्या संसद निर्मितीत महाराष्ट्राची छाप; सातारच्या प्रकाशकडं सोपवलं फॅब्रिकेशनचं काम

नारायण राणेंमुळे सिंधुदुर्गात थांबा

‘वंदे भारत’ला कणकवली स्थानकात थांबा निश्‍चित झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जिल्ह्यात थांबा मिळवून देऊन जिल्‍हावासीयांना न्याय दिला आहे. कणकवलीत थांबा दिल्‍याबद्दल रेल्‍वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो, असे आमदार नीतेश राणे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com