राबगावच्या वरदायिनी देवीची यात्रा भक्तिमय वातावरणात साजरी

अमित गवळे
सोमवार, 2 एप्रिल 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील राबगाव येथील वरदायिनी देवीची यात्रा व पालखी सोहळा चैत्र शुध्द पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी झाला. आकर्षक देवाच्या (सासन) काठ्या यात्रेतील खास आकर्षण होत्या.

दुपारी ४ वाजल्यापासून या यात्रेला सुरुवात झाली. राबगावसह गावाच्या असलेल्या चार वाडयांमधून देवाच्या (सासन) काठ्या नाचवत आणल्या जातात. ढोल ताश्या व डीजे च्या तालावर या रंगीबेरंगी सजविलेल्या आकर्षक काठ्या तरुण तसेच जेष्ठ मोठ्या हौशिने नाचवितात. या यात्रेमध्ये उंबरवाडी,नंबरवाडी, गावठेवाडी, जांभूळमाळ, कातकरवाडी यांच्यासह आजूबाजूच्या परिसरातील हजारो भाविक उपस्थिती होते.

या यात्रेत मिठाइची, खेळण्यांची दुकाने, विविध खाद्य पदार्थांची दुकाने लागलेले होती. यातून सर्व व्यावसायिकांची लाखो रुपयांची उलाढाल झाली.  यात्रा संपल्यावर लगेचच मंदिरातून वरदायिनी देवीची पालखी हरिनामाच्या जयघोषात काढली गेली. ही पालखी संपूर्ण गावात फिरते प्रत्येक घरासमोर पालखीचे स्वागत केले गेले. यावेळी घरासमोर रांगोळी काढून व सर्वत्र पताकां लावून पूर्ण परिसर सजविलेला होता. गावातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
 
Web Title: vardayini devi yatra celebrates enthusiastically in rabgao