कोकण : चिपळूण शहरात समाविष्ट होण्यासाठी काही गावांचा विरोधच

various village reject the decision of including in chiplun city in ratnagiri
various village reject the decision of including in chiplun city in ratnagiri
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूण शहराची हद्दवाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शहरात दहा गावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याला काही गावांचा विरोध आहे. हा विरोध मोडून प्रशासनाला हद्दवाढीसाठी पाऊले उचलावी लागणार आहेत. 

चिपळूण शहराची हद्दवाढ 44 वर्षे रखडलेली आहे. हद्दवाढ न झाल्यामुळे शहराचा श्‍वास गुदमरला आहे. यापूर्वी पालिका प्रशासनाकडून हद्दवाढीचे प्रस्ताव पाठवण्यात आले, मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हद्दवाढ झाली नाही. रत्नागिरी शहराची हद्दवाढ मंजूर झाली. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील चिपळूण, खेड आणि दापोली शहराची हद्दवाढ करण्याचा इरादा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केला. जी गावे शहरात समाविष्ट होणार आहेत, तेथील काही लोकांचा हद्दवाढीला विरोध तर काहींचा पाठिंबा आहे. 

खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर यांनी हद्दवाढीला पाठिंबा दिला. ते म्हणाले, खेर्डीची नगरपंचायत होणार नसेल तर केवळ विकासाच्या मुद्दयावर आम्ही हद्दवाढीला पाठिंबा देऊ. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि खेर्डी ग्रामपंचायतीचे प्रमुख मार्गदर्शक जयंद्रथ खताते यांनी हद्दवाढीला विरोध केला आहे. ते म्हणाले, आम्ही आमच्या गावचा विकास करण्यासाठी सक्षम आहोत. आम्हाला चिपळूण शहरामध्ये समाविष्ट व्हायचे नाही. सरकारकडून येणाऱ्या निधीचा योग्य प्रकारे वापर करून तसेच अधिकचा निधी आणून आम्ही आमच्या गावचा विकास करू पण शहरात सामील होणार नाही. 

मिरजोळीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अजमल दलवाई यांनीही हद्दवाढीला विरोध केला. आम्हाला नगरपंचायत नको, गावचा विकास करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांना हव्या त्या सुविधा देत आहोत. रोजगाराच्या संधीही उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्हाला शहरात समाविष्ट व्हायचे नाही. धामणवणे ग्रामपंचायतीचे सदस्य सुभाष जाधव म्हणाले, धामणवणे गाव चिपळूण शहरात आल्यानंतर आमच्या हक्कावर गदा येईल.

सद्यःस्थितीत गावातील कोणती कामे करायची, हे आम्हीच ठरवत आहोत. शहरात सहभागी झाल्यानंतर आम्हाला दुसऱ्याच्या दारात खेटे मारावे लागतील. आमचे गाव छोटे असल्याने आम्हाला विकासकामांचे नियोजन करणे व इतर कामे शासकीय निधीतून करणे सोपे जात आहे. त्यामुळे आम्हाला चिपळूण शहरात जायचे नाही.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com