वसुधा सोसायटीने शासकीय व रहदारीच्या मार्गावर लावलेली कमान हटविली

अमित गवळे 
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

पाली - सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनिकरण व वृक्षलागवड संस्थेने येथील रहदारीच्या मार्गावर कमान बसविली होती. वसुधा सोसायटीची कमान हटविण्यात यावी याकरीता वाफेघर व विडसई ग्रामस्तांनी ८ ऑक्टोंबर रोजी येथील तहसिलकार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यामुळे वसुधा सोसायटीने हि कमान नुकतीच हटविली आहे.

पाली - सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनिकरण व वृक्षलागवड संस्थेने येथील रहदारीच्या मार्गावर कमान बसविली होती. वसुधा सोसायटीची कमान हटविण्यात यावी याकरीता वाफेघर व विडसई ग्रामस्तांनी ८ ऑक्टोंबर रोजी येथील तहसिलकार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यामुळे वसुधा सोसायटीने हि कमान नुकतीच हटविली आहे.

या आधी सुद्धा सोसायटीने लावलेली कमान हटविण्यासाठी ग्रामस्तांनी आंदोलन केले होते. अखेर त्यावेळी प्रशासनाच्या कारवाईनंतर कमान हटविण्यात आली होती. मात्र हटविण्यात आलेली कमान पुन्हा बसविल्याने वाफेघर व विडसई ग्रामस्त संतप्त झाले होते. शासकीय आणि रहदारीच्या मार्गावर बसविण्यात आलेल्या प्रवेशद्वारावरील कमान हटविण्यात यावी याकरीता 8 ऑक्टोंबर 2018 रोजी पाली तहसिलकार्यालयासमोर सुधीर वाघमारे, नितीन मेने, महादेव वाघमारे, केतन चव्हाण आदींनी आमरण उपोषण केले होते. दरम्यान पाली तहसिलदार बि. एन. निंबाळकर यांनी वसुधा सोसायटीला चार दिवसात कमान हटविण्याचे लेखी आदेश दिले असल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते. अखेर वसुधा सोसायटीने ग्रामस्तांच्या आंदोलनात्मक भुमिकेनंतर ती वादग्रस्त कमान हटविली आहे. विडसई व वाफेघर ग्रामस्तांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे राजेश बेलोसे यांनी सकाळला सांगितले.

वसुधा सोसायटीची कमान हटविण्यात यावी याकरीता वाफेघर विडसई ग्रामस्त राजेश बेलोसे, सुधीर वाघमारे, तातुराम चव्हाण, अनंता मेणे, ग्रा.पं.सदस्य नितीन मेणे व अमोल कांबळे, गिता गणेश चव्हाण, महादेव वाघमारे, प्रशांत वाघमारे संजय वाघमारे, नितीन वाघमारे, निर्मला चव्हाण, सुलभा चव्हाण, वैशाली चव्हाण, आदिंसह ग्रामस्थांनी कमान हटविण्याची मागणी लावून धरली होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasudha Society take action on entrance