
Vehicle Carrying Beef
esakal
Sindhudurg Police : गोमांस वाहतूक होत असल्याच्या संशयावरून तिलारी येथे सुमारे ५० जणांच्या जमावाने मोटार पेटविल्याच्या प्रकरणाला गंभीर वळण लागले. पोलिसांसमक्ष संबंधित चालकाला जमावाने मारहाण केली. यानंतर दोडामार्ग पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले. स्वतः पालकमंत्री नीतेश राणे येथे दाखल झाले.
पोलिसांनी येथील नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस व अन्य मिळून पाच जणांना अटक केली. या प्रकरणाने निर्माण झालेला तणाव आजही कायम होता. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.