‘वेंगुर्लेसाठी निधी कमी पडू देणार नाही’ - जयकुमार रावल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

वेंगुर्ले - निसर्गाचे वरदान असलेल्या शहराचा विकास पर्यटन केंद्रबिंदू मानून सर्वपक्षीय नगरसेवकांनी काम करावे. पालिकेला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्‍वासन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज येथील पालिकेत दिले.

सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेल्या श्री. रावल यांनी आज येथील पालिकेला भेट दिली. या वेळी श्री. रावल बोलत होते. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी रामदास कोकरे, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, संदेश पारकर, स्नेहा कुबल आदी उपस्थित होते. या वेळी नगराध्यक्ष गिरप यांनी निमुसगा गार्डन पर्यटकांसाठी विकसित करणे, दीपगृहाकडे जाणारा रास्ता विकसित करणे, स्वच्छ भारत पर्यटन स्थळाच्या ठिकाणी म्युझियम व प्रशिक्षण केंद्र उभारणे, वेंगुर्ले बंदर येथे व्होटर स्पोर्टस्‌ व स्कुबा डायविंग सेंटर उभारणे यासाठी निधी उपलब्ध करून मिळावा, अशा मागण्यांचे निवेदन श्री. रावल यांना दिले. ऐतिहासिक वास्तू असलेली डच वखारीची डागडुजी करावी, या मागणीचे निवेदन नगरसेविका श्रेया मयेकर यांनी श्री. रावल यांना दिले. या वेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: Vengurle will not be for less of funds