esakal | रिफायनरीवरून शिवसेना - भाजप तालुकाध्यक्ष यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी 
sakal

बोलून बातमी शोधा

Verbal Juggling Between Shiv Sena BJP Taluka President On Refinery

गणेशोत्सवामध्ये कुवळेकर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी जुंपली आहे. दोघांनीही एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत.

रिफायनरीवरून शिवसेना - भाजप तालुकाध्यक्ष यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - स्थानिकांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असून त्यांच्या बाजूने उभी राहत शिवसेनेने रिफायनरीला विरोध केला. भविष्यामध्ये या ठिकाणी रिफायनरी होणार नाही. रिफायनरीच्या दलालीचा केंद्रबिंदू नेमका कुठे आहे, हे साऱ्यांना माहिती असल्याचा टोला शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांनी लगावला. 

गणेशोत्सवामध्ये कुवळेकर आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी जुंपली आहे. दोघांनीही एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. आता जोरदार पलटवार करताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर म्हणाले, खासदार विनायक राऊत यांचा मतदारसंघाशी दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्यावर बोलण्याची कुवत नाही. माजी आमदार प्रमोद जठार यांची कोल्हेकुई करण्यापेक्षा राजकारणात स्वतः आधी परीपक्व व्हा, स्वतःची कुवत ओळखा नंतरच दुसऱ्यांवर बोला, असा दोन दिवसांपूर्वी गुरव यांनी रिफायनरीच्या मुद्‌द्‌याच्या अनुषंगाने कुवळेकर यांच्यावर टीका करताना रिफायनरीतील कुवळेकर यांना काय समजते ? यांचा त्याबाबत अभ्यास किती ? असा प्रश्‍न उपस्थित करीत खासदारांनी मतदारसंघात लक्ष द्यावे, असा टोला हाणला होता. त्याला कुवळेकर यांनी आज पत्रकार परिषद घेवून प्रत्यूत्तर दिले.

यावेळी उपतालुकाप्रमुख तात्या सरवणकर, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश गुरव, विभागप्रमुख नरेश दुधवडकर, माजी संपर्कप्रमुख संतोष पावसकर, मधुकर बाणे आदी उपस्थित होते. 

कुवळेकर म्हणाले, खासदार राऊत यांचा मतदारसंघामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. मतदारसंघामध्ये सेना भक्कम असून या मतदारसंघाचा पुन्हा एकदा खासदार शिवसेनेचा होईल. भाजपची सत्ता येईल म्हणून आपण दोनवेळा बॅनरबाजी केली होती. मात्र, दोन्हीवेळा ती काढून टाकण्याची नामुष्की का आली, याचे आत्मचिंतन करावे. राजकारणात परीपक्व व्हा, अभ्यास करा आणि नंतर टीका करा. 

संघटनेचा आदेश पाळतो 
गेली 32 वर्ष आपण एकनिष्ठेने शिवसेनेमध्ये विविध पदांवर काम करतोय. आपल्या कामाची दखल वरिष्ठांनी वेळोवेळी घेऊन विविध पदे भूषविण्याची संधी दिली. त्याला न्याय देताना तालुक्‍यामध्ये शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या साथीने शिवसेना भक्कम ठेवली आहे. भाजपसोबत नसतानाही तालुक्‍याच्या राजकारणात सेनेची एकहाती सत्ता आहे. त्यातून, विधानसभेसाठी आपण इच्छुक होतो. उमेदवारी देण्याचा निर्णय संघटनेचा असून आम्ही संघटनेचा आदेश पाळणारे आहोत. त्यामुळे संघटनेने दिलेला निर्णय पाळला असे कुवळेकर यांनी सांगितले. 
 

 
 

loading image