रत्नागिरी मत्स्यालयास दरवर्षी दीड लाख पर्यटक भेट देतात - कुलगुरू डाॅ. विश्‍वनाथा

रत्नागिरी मत्स्यालयास दरवर्षी दीड लाख पर्यटक भेट देतात - कुलगुरू डाॅ. विश्‍वनाथा

रत्नागिरी - येथील मत्स्यालयात वेगवेगळ्या जातींचे मासे पाहायला मिळतात. देशात अन्यत्र कोठेही एवढ्या प्रकारचे मासे एकाच ठिकाणी पाहायला मिळत नाही. येथील मत्स्यालयाला दरवर्षी दीड लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. देशात हे मत्स्यालय फारच लोकप्रिय होईल, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी केले. 

कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात "शाश्‍वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकासः आव्हाने आणि संधी' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद सुरू आहे. शनिवारी (ता. 19) सायंकाळी ते या परिषदेला उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकरी आणि मच्छीमारांची आर्थिक उन्नती होईल, यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून पुढील दोन वर्षात शेतकऱ्यांना अपेक्षेएवढे उत्पन्न मिळेल

- डॉ. के. पी. विश्‍वनाथा, प्रभारी कुलगुरू  

विश्वनाथा म्हणाले, मागील काही वर्षात मत्स्य व्यवसायात मोठी प्रगती झाली. मत्स्य व्यवसायात चीननंतर भारतात सर्वात अधिक उलाढाल होते. आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक संशोधक, विचारवंत, मत्स्य व्यावसायिकांनी विचार मांडले. अन्य भागात राबविलेले उपक्रम यांची माहिती परिषदेत मिळाली. विचारांच्या आदान-प्रदानाचा येथील युवक आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या विविध तांत्रिक सत्रात उत्कृष्ट सादरीकरण केलेला शास्त्रज्ञांचा सन्मान केला. 

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा निर्णय शासन कोर्टात 
कोकण कृषी विद्यापीठातील रोजंदारीवर काम करणाऱ्या श्रमिक कामगार संघटनेच्या 285 कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात कायम होण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या मागण्यांबाबत विद्यापीठाचे प्रशासन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. याबाबत सर्व अहवाल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला असून मंत्रालयात याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com