दोन तरुणांना चिंचेच्या झाडाला बांधून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल | Beating | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन तरुणांना चिंचेच्या झाडाला बांधून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
दोन तरुणांना चिंचेच्या झाडाला बांधून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

दोन तरुणांना चिंचेच्या झाडाला बांधून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

sakal_logo
By
अमित गवळे

पाली - सुधागड तालुक्यात एका गावात सार्वजनिक कार्यक्रमास आलेल्या दोन तरुणांना चिंचेच्या झाडाला दोराने बांधून बेदम चोप दिला जात आहे. असा व्हिडीओ सध्या समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून सदरचा व्हिडीओ सुधागड तालुक्यातील चिवे आदिवासीवाडी येथील असल्याचे समोर आले आहे. तर ज्या दोन तरुणांना झाडाला बांधून शिक्षा देण्यात आली ते तरुण सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर आदिवासी वाडी येथील असल्याचे बोलले जातेय. मारहाण करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लोक करत आहेत. तसेच या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा: मुलाकडे जाते असे सांगून निघालेली जेष्ठ महिला बेपत्ता

सदरचा प्रकार हा अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे. या घटनेची प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. जेणेकरून पुन्हा असे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही.

- रमेश पवार, कोकण संघटक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

सुधागड तालुक्यातील दोन तरुणांना झाडाला दोराने बांधून शिक्षा केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ज्या तरुणांना मारहाण झाली आहे त्या तरुणांनी कोणतेही भय न ठेवता पोलीस स्थानकात तक्रार दिल्यास त्या दृष्टीने तपास करता येईल. व दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करता येईल.

- विजय तायडे, पोलीस निरीक्षक, पाली-सुधागड

loading image
go to top