Vidhan Sabha 2019 : उद्धव ठाकरे कुडाळात कोणती तोफ डागणार ?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

कुडाळ -  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात रंगत येणार असून जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीनही जागांवरील लढतींकडे राज्याच लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या 16 ऑक्टोबरला कुडाळ येथे जाहीर सभा घेत आहेत.

कुडाळ -  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात रंगत येणार असून जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीनही जागांवरील लढतींकडे राज्याच लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या 16 ऑक्टोबरला कुडाळ येथे जाहीर सभा घेत आहेत.

Vidhan Sabha 2019 : नारायण राणेंचे शिवसेनेशी जुळवून घेण्याचे संकेत 

याचबरोबर कणकवलीत शिवसेनेच्या उमेदवारासाठीही जाहीर सभा उद्धव ठाकरे यांनी घ्यावी यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. कुडाळ - विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक, सावंतवाडी मतदार संघाचे उमेदवार मंत्री दिपक केसरकर आणि कणकवली मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे तोफ डागणार आहेत. कणकवलीत नीतेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिल्याने या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेच्या विरोधात भाजप पुरस्कृत उमेदवार दिल्याने सिंधुदुर्गात युती नाही हे स्पष्ट झाले आहे. यावर ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता कोकणवासियांना लागली आहे.  

Vidhan Sabha 2019 : रोजगारासाठी कोल्हापुरात आयटी हब उभारू ; अमित शहांचे आश्वासन 

बुधवारी (ता.16) दुपारी तीन वाजता त्यांची प्रचार सभा कुडाळ बसस्थानकासमोरील मैदानावर होणार आहे. त्यादृष्टीने या सभेचे नियोजन शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सुरु आहे. पक्षप्रमुख ठाकरे येत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 on 16 October Uddhav Thackeray in Kudal