Vidhan Sabha 2019 : तेलींनी "ईडी'चा लपंडाव केल्याचा केसरकरांचा आरोप

Vidhan Sabha 2019 : तेलींनी "ईडी'चा लपंडाव केल्याचा केसरकरांचा आरोप

वेंगुर्ले - माझ्यावर रडीचा डाव खेळला, असे आरोप करणाऱ्या राजन तेलींनी स्वतः ईडीचा लपंडाव केला असून त्यांनी प्रतिज्ञापत्रात "ईडी'च्या गुन्ह्याचा तपशील लपवला, असा आरोप पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला. 

श्री. केसरकर यांनी आज तालुक्‍याचा झंझावाती प्रचार दौरा केला यावेळी तुळस येथे आयोजित सभेत त्यांनी राजन तेली यांच्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, ""आपण कोणाला त्रास दिला नाही आणि देणार नाही; परंतु आमच्या लोकांना त्रास दिला तर कोणाला सोडणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अपप्रवृत्ती हद्दपार करून येथील लोकांना शांततेचे जीवन जगू द्या.'' 

ते पुढे म्हणाले, ""माझ्यावर तेलींनी रडीचा डाव खेळल्याचा आरोप केला होता; परंतु त्यांनी मात्र आपल्या प्रतिज्ञापत्रात ईडीकडुन आलेल्या नोटिशीची माहिती लपवली आहे ही वस्तूस्थिती आहे. कोणतीही सत्ता नसताना मी ही कामे केली, ही प्रकरणे मंजूर करून आणली, असं खोटं सांगत प्रचार करणारे तेली खोटारडे आहेत.'' 

यावेळी नितीन मांजरेकर, सचिन गडकर, संतोष कासले, संजू मांजरेकर, सुप्रिया होडावडेकर, श्‍याम नाईक, प्रशांत वेंगुर्लेकर, दशरथ पेडणेकर, दाजी पाटकर, बाळा पाटकर, मधुकर धुरी, तुकाराम धुरी, मनाली धुरी आदी उपस्थित होते. केसरकर यांनी तुळस येथील प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुळस येथील या बैठकीला तब्बल दोनशेहुन अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com