esakal | Vidhan Sabha 2019 : ...यासाठीच राणेंचा भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारास पाठींबा
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : ...यासाठीच राणेंचा भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारास पाठींबा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 ला नीतेश राणे यांच्या प्रचारानिमित्त कणकवलीत प्रचार सभा घेणार आहेत. यावेळी आयोजित जाहीर सभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात येणार आहे. 

- नारायण राणे 

Vidhan Sabha 2019 : ...यासाठीच राणेंचा भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारास पाठींबा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - पालकमंत्री म्हणून निष्क्रिय ठरलेले दीपक केसरकर पुन्हा आमदार म्हणून निवडून येऊ नयेत, यासाठी आम्ही भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. इथल्या जनतेने राजन तेलींसारख्या विकास करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.  

श्री. राणे हे आज सावंतवाडीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली माहिती दिली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सुदन बांदिवडेकर, माजी आमदार राजन तेली, स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब, भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग, सभापती पंकज पेडणेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 ला नीतेश राणे यांच्या प्रचारानिमित्त कणकवलीत प्रचार सभा घेणार आहेत. यावेळी आयोजित जाहीर सभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात येणार आहे. 

- नारायण राणे 

श्री. राणे म्हणाले, ""पालकमंत्री केसरकर याठिकाणचे स्थानिक आमदार आहेत; मात्र गेल्या पाच वर्षात त्यांचे काम पाहिले असता निष्क्रिय आमदार म्हणून त्यांची वाटचाल राहिली. जिल्ह्याचा विचार करता पालकमंत्री म्हणून मंजुर कोणतेही प्रकल्प सुरू केले नाहीत. निधी आणला नाही. केलेल्या घोषणा पूर्ण करू शकले नाहीत आणि म्हणूनच असे निष्क्रिय केसरकर पुन्हा आमदार नको म्हणून तेली यांना समर्थन दिले आहे.''

ते म्हणाले, ""आम्हाला इथल्या जनतेचा विकास हवा आहे. तिन्ही तालुक्‍यात रस्त्यांची झालेली दुर्दशा, ठप्प पडलेला विकास, वाढलेली बेकारी आदी प्रश्‍न कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यांना न्याय देण्याचे काम केसरकर करू शकले नाहीत. त्यामुळे इथल्या जनतेने आपला विकास करू शकणाऱ्या तेली यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. सर्वांचे कार्यकर्तेही एक दिलाने तेली यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील.''

श्री. राणे पुढे म्हणाले, ""कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष गलितगात्र झाले असून ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात एकतर्फी होईल.''

यावेळी कणकवली शिवसेनेने तोडलेल्या युती संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी याबाबत शिवसेनेने उत्तर द्यावे, असे स्पष्ट केले.