Vidhan Sabha 2019 : राणेंचा स्वाभिमान आज होणार भाजपमध्ये विलिन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कणकवली येथे प्रचार सभा होणार आहे. यामध्ये स्वाभिमान पक्ष विलीनीकरणाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे

कणकवली - भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कणकवली येथे प्रचार सभा होणार आहे. यामध्ये स्वाभिमान पक्ष विलीनीकरणाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली आहे.

Vidhan Sabha 2019 : स्मृती इराणी म्हणाल्या, घरात साफसफाई करतो, तसे काँग्रेस साफ करा 

कणकवली उपजिल्हा रूग्णालयासमोर उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपात ही सभा सकाळी ११ वाजता होणार आहे. कणकवली उपजिल्हा रूग्णालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या या जाहिर प्रचार सभेसाठी हजारो लोक बसतील असा वॉटरप्रुफ सभा मंडप उभारण्यात आलेला आहे. जेणेकरून पाऊस आणि उन्हाचा त्रास होणार नाही अशी सुसज्ज व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Vidhan Sabha 2019 : कोकणात मुलांच्या भविष्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा 

कणकवली - देवगड - वैभववाडी मतदार संघातील नागरीक याठिकाणी सभेला येणार आहेत. त्यांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था महाडेश्वर हॉस्पिटलच्या मागे आणि रेल्वे स्टेशनपासुन नरडवे रोडवर केली आहे.

सिंधुदुर्गात नारळ पाण्यावरील प्रकल्पासह नवे चार प्रकल्प प्रस्तावित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Narayan Rane Swabhiman party will merge in BJP Today