Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीला हवी राजापूरची जागा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

राजापूर - वारंवार पराभव स्वीकारूनही गेल्या काही वर्षांमध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा गड राहिला आहे. त्यामुळे संभाव्य आघाडी डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसने राजापूर मतदारसंघावर पुन्हा एकदा दावा केला आहे. वारंवार काँग्रेस अपयशी ठरत असल्यामुळे या वेळी जागा बदलाचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. आघाडीतील जागा वाटपामध्ये राजापूर मतदारसंघात अदलाबदल होणार की पूर्वीचा फॉर्म्युला कायम राहणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

अद्यापही शिवसेना - भाजप युती वा काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीची घोषणा अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. राजापूर विधानसभा मतदारसंघ कायमच काँग्रेसकडे राहिला आहे. १९९० मध्ये माजी राज्यमंत्री कै. ल. र. हातणकर यांनी मिळविलेल्या विजयानंतर थेट २००६ च्या पोटनिवडणुकीमध्ये तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार गणपत कदम यांनी मिळविलेला विजय काँग्रेसच्या उमेदवाराचा शेवटचा विजय ठरला. त्यानंतर सातत्याने काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश आले.

जिल्ह्यातील अन्य चार मतदारसंघाच्या तुलनेमध्ये या ठिकाणी काँग्रेसची ताकद लक्षणीय आहे. त्या ताकदीच्या जोरावर काँग्रेसने पुन्हा एकदा राजापूरवर दावा केला. आघाडीच्या संभाव्य जागा वाटपामध्ये अदलाबदल व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. या साऱ्या राजापूर विधानसभा मतदासंघातील रेटारेटीमध्ये आघाडीच्या जागा वाटपात राजापूर विधानसभा मतदारसंघाबाबत पूर्वीचा फॉर्म्युला कायम राहणार की अदलाबदल होणार, हा औत्सुक्‍याचा विषय ठरला आहे.

यशवंतराव यांची उमेदवारी निश्‍चित
काँग्रेसचे नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांच्यामध्ये चुरस आहे. आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यास यशवंतराव यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. काँग्रेसकडूनही यशवंतराव इच्छुक आहेत. त्यामुळे मतदारसंघ काँग्रेसकडे कायम राहिल्यास काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी लाड यांच्या जोडीने यशवंतराव यांचा दावाही राहणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 NCP Wants Rajapur Seat