Vidhan Sabha 2019 : प्रचाराबाबत सिंधुदुर्गातील रिपाईचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

ओरोस - राज्यात युतीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जात आहेत. रिपब्लिकन पक्ष या युतीचा घटक पक्ष आहे; मात्र सिंधुदुर्गातील युतीच्या तिन्ही उमेदवारांनी येथील रिपाई पक्षाला विश्वासात घेतलेले नाही. परिणामी जिल्ह्यातील आमच्या पक्षात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जोपर्यंत आमचे पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांचा आदेश येत नाही, तोपर्यंत आम्ही युतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका रिपाई जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील गंगाई हॉटेलमध्ये आज या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी जाधव, युवा जिल्हाध्यक्ष वैभव वळजू, नंदू टीकम, संदीप पिंगुळकर, वंदना अंजनकर, सागर जाधव उपस्थित होते.

श्री. कदम म्हणाले, ""युतीचे उमेदवार म्हणून मी जिल्हाध्यक्ष या नात्याने दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होतो; मात्र त्यानंतर केवळ निवडणुकीला उगवणाऱ्या गणपत जाधव यांना घेवून युतीच्या उमेदवारांनी प्रचार सुरु केला आहे. परिणामी आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. आम्हाला विश्वासात घेतले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.'' 

ते म्हणाले, ""पक्षाचे अध्यक्ष आठवले यांनी युतीच्या उमेदवारांचाच प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत. आम्हालाही युतीचा प्रचार करायचा आहे. परंतु यासाठी आम्हाला विश्वासात घेणे अपेक्षित आहे. ज्या लोकांना घेवून युतीचे उमेदवार प्रचार करीत आहेत. ते फक्त निवडणुकीला उगवतात. इतरवेळी आम्हीच समाजातील लोकांचे प्रश्न सोडवत असतो. तरीही त्यांनाच घेवून फिरत असतील तर आम्हाला प्रचारात उतरायचे की नाही, याचा विचार करावा लागेल. आता पक्षाध्यक्ष आठवले यांचा आदेश येत नाही तोपर्यंत प्रचारात उतरणार नाही.'' 

त्यांचा निरोप का स्वीकारावा? 
""मी पक्षाध्यक्ष यांच्या जवळचा असल्याने पक्षातील मुंबई येथील मोठ्या नेत्यांना रुचलेले नाही. त्यामुळे ते गणपत जाधव यांचा वापर करीत आहेत. परिणामी अशांमुळे पक्षाचे नुकसान होत आहे. कणकवलीतील युतीचे उमेदवार नितेश राणे यांनी संदीप कदम यांच्या माध्यमातून प्रचाराला येण्याचा निरोप पाठविला होता; परंतु, कदम हे आमच्या पक्षातील नसल्याने त्यांचा निरोप का स्वीकारावा? असा प्रश्न रतनभाऊ कदम यांनी उपस्थित केला.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Ratanbhau Kadam comment