Vidhan Sabha 2019 : चिपळूणात सदानंद चव्हाणांचेही जोरदार शक्तीप्रदर्शन 

Vidhan Sabha 2019 : चिपळूणात सदानंद चव्हाणांचेही जोरदार शक्तीप्रदर्शन 

चिपळूण - शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार सदानंद चव्हाण यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. कडक उन्हाची तमा न बाळगता कार्यकर्ते, महिला उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीपेक्षा अधिक शक्तीप्रदर्शन करीत तोडीस तोड ताकद दाखवून दिली. जोरदार घोषणा आणि ढोल ताशे, झांजपथकांचा गजराने शहर भगवेमय करून टाकले होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार शेखर निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणत्याही वरिष्ठ नेत्याला निमंत्रीत केले नव्हते. तरीही निकमांच्या प्रेमापोटी अफाट गर्दी झाली होती. त्यामुळे आमदार सदानंद चव्हाण यांच्या शक्तीप्रदर्शनाकडे मतदार संघाचे लक्ष लागले होते. दुपारी बारा पर्यंत चिपळूण आणि संगमेश्‍वर तालुक्‍यातील कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व ग्रामस्थांच्या गाड्यात शहरात येतच होत्या.

कार्यकर्त्यांनी पालिकेचे ठिकाण गाठले. पालिकेसमोरून मिरवणुकीला सुरवात झाली. मिरवणुकीसाठी काही गाड्यांची खास सजावट केली होती. पालिकेपासून पंचायत समितीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. उन्हाच्या कडाक्‍यात वयस्क महिलांही ठाण मांडून होत्या. पंचायत समितीजवळ महामार्गालगत सभा झाली. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार चव्हाणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सभेला महायुतीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. महामार्गालगत सभा असल्याने रस्त्यावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. परिणामी काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. 

सुमारे सव्वा कोटीची संपत्ती 

चव्हाण यांनी आपली एकूण संपत्ती सुमारे सव्वा कोटी रूपयेची दर्शवली आहे. यामध्ये स्वतः तसेच पत्नी व तीन मुलांच्या नावे असलेल्या विविध मालमत्तेचा तपशील दिला आहे. चव्हाण यांच्याकडे रोख एक लाख रुपये आहे. तर एकूण गुंतवणुकीचे स्थूल मूल्य 37 लाख, 35 हजार 453 आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तेचे बाजारमूल्य 37 लाख 58 हजार आहे. चव्हाण यांनी वाहनांसाठी 6 लाख 3 हजार 51 रुपयाचे कर्ज घेतले आहे. त्यांची जंगम मालमत्ता 37 लाख 35 हजार 543 इतकी आहे. तर वारसा हक्काने प्राप्त झालेल्या संपत्तीचे मूल्य 11 लाख 28 हजार इतकी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com